पाळत ठेवलेल्याचा दावा चुकीचा, नावांची यादीही चुकीची, बनावट माहितीवर अवलंबून लोकांची दिशाभूल करू नका, पेगासस स्पायवेअरच्या निर्मात्यांनी एनडीटीव्हीला सुनावले


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: फोर्बिडन स्टोरीज या संस्थेच्या बनावट माहितीवर अवलंबून बातम्या देऊ नका. लोकांची दिशाभूल करू नका. त्यांनी प्रसिध्द केलेली यादीतील लोकांवर पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात आलेले नाही असे पेगासस सॉफ्टवेअरची निर्माती कंपनी असलेल्या एनएसओने एनडीटीव्हीला सांगितले आहे.Surveillance claims false, list of names wrong, don’t mislead people based on fake information, Pegasus spyware makers told NDTV

पाळत ठेवलेल्या लोकांची जी यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे पूर्णत: खोटी आहे. एनएसओने कधीही या लोकांवर लक्ष्य ठेवलेले नााही. ही यादी चुकीची आणि दिशाभूल करणारी असल्याचे एनएसओच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.



पॅरीस येथील स्वयंसेवी संस्था असलेल्या फोर्बिडन स्टोरीज या गटाने संपूर्ण जगात काही लोकांवर पाळत ठेवण्यात आल्याचे म्हटले आहे. याबाबत एनएसओच्या प्रवक्त्याने सांगितले की, त्यांच्या ग्राहकांचा डाटा कंपनीकडे नाही. पण त्यांनी आम्हाला ही माहिती पुरविणे बंधनकारक आहे. एनएसओच्या तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्याचा पुरावा मिळाला तर त्याची कसून चौकशी केली जाईल.

भारतातील अनेक पत्रकार, केंद्रीय मंत्री, सुप्रीम कोटार्चे न्यायाधीश आणि प्रशासकीय अधिकाºयांची फोन टॅपिंगच्या माध्यमातून हेरगिरी करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. द गार्डियन आणि वॉशिंग्टन पोस्टनेही याबाबत वृत्त दिले आहे. इस्रायल येथील एनएसओ या कंपनीच्या माध्यमातून पेगासस नावाच्या विशेष सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हेरगिरी केली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितले की फोन नंबर्सच्या माध्यमातून डेटा हॅक झाल्याचे संबंधित प्रकाशित अहवालातून ठामपणे सांगण्यात आलेले नाही. वेबपोर्टलनं जारी केलेल्या अहवालातून पाळत ठेवली गेली आहे हे सिद्ध होऊ शकत नाही. एनएसओकडूनही संबंधित अहवाल धादांत खोटा आणि तथ्यहीन असल्याचं सांगण्यात आलेलं आहे.

फोन क्रमांकाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींचे डिव्हाईस पेगासस सॉफ्टेवेअरच्या माध्यमातून हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचा कोणताही पुरावा यात देण्यात आलेला नाही. त्यामुळे देण्यात आलेले फोन क्रमांक खरंच हॅक झाले होते का हे सिद्ध होत नाही.

आपल्या देशाच्या प्रबळ संस्थांमध्ये हेरगिरी किंवा अवैध पद्धतीनं पाळत ठेवणं अजिबात शक्य नाही. देशात यासाठी एक चांगली प्रक्रिया आहे की ज्यामाध्यमातून राष्ट्रीय सुरक्षेच्या उद्देशातून इलेक्ट्रॉनिक संचाराचं सुयोग्य पद्धतीनं पालन होत आह.

Surveillance claims false, list of names wrong, don’t mislead people based on fake information, Pegasus spyware makers told NDTV

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात