विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सध्या देशभरातील विविध तुरुंगांमध्ये चार लाख कैदी असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस कर्मचारी देखील तैनात करण्यात आले आहेत. न्यायालयाने या दोन्ही घटकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेताना तुरुंगातील कैद्यांची गर्दी कमी करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. मागील वर्षी जामीन अथवा पॅरोल मंजूर करण्यात आला त्यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आले आहेत. Supreme court worried abot health of prisnors
सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आज याबाबत सुनावणी झाली. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या उच्चस्तरीय समित्यांनी ज्या कैद्यांना मागील वर्षी मार्चमध्ये जामीन मंजूर केला होता त्यांना तातडीने दिलासा देत त्यांची सुटका केली जावी असे न्यायालयाने म्हटले आहे. आम्ही आधी दिलेल्या आदेशांना अनुसरून ज्या कैद्यांना पॅरोल मंजूर करण्यात आला होता त्यांना आणखी नव्वद दिवसांचा पॅरोल मंजूर केला जावा, असेही न्यायालयाच्या ताज्या आदेशांत नमूद करण्यात आले आहे. न्यायालयाचा हा आदेश संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App