नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला; दहा दिवसात शरण येण्याचे आदेश


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप नेते नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयातही दिलासा मिळाला नाही. येत्या दहा दिवसात न्यायालयासमोर हजर व्हा आणि नियमित जामीन घ्या, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. Supreme Court rejects Nitesh Rane’s anticipatory bail plea Order to surrender within ten days

अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळल्याने हा नितेश राणे यांना मोठा धक्का मानला जात आहे. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला हा सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय मानला जात आहे. येत्या दहा दिवसांसाठी नितेश राणे यांना अटकेपासून संरक्षण मिळालेले आहे. त्यामुळे आता कनिष्ठ कोर्टात नितेश राणेंना जामीन मिळतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.  नितेश राणेंवरील आरोप खोटे असून राजकीय सुडापोटी करण्यात आलेले हे आरोप असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्याचे राणेंच्या वकिलांनी सांगितले.



सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा यांच्या समोर नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. नितेश राणे यांच्या वतीने मुकूल रोहतगी तर राज्य सरकारच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. कोर्टात दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला.

कनिष्ठ न्यायालयात अर्ज करावा लागणार

पुढच्या दहा दिवसात नितेश राणे यांनी नियमित जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात अर्ज करायचा आहे. त्याकरता दहा दिवसांची वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे, असे पण कोर्टाने ऑर्डरपास करून त्यांना नियमित जामिनासाठी अर्ज करण्यास सांगितले आहे, असे देसाई म्हणाले.

Supreme Court rejects Nitesh Rane’s anticipatory bail plea Order to surrender within ten days

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात