विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीरपणे विचार करीत असल्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सांगितले. Supreme court proceeding telicast live in future
सर्वोच्च न्यायालयातील व्हर्च्युअल कामकाज प्रसारमाध्यमांना उपलब्ध करून देणाऱ्या ॲप्लिकेशनचे उद्घा्टनाप्रसंगी सरन्यायाधीश बोलत होते. नव्याने विकसित झालेले हे तंत्रज्ञान संवेदनशील असून वापर करताना सुरुवातीच्या काळात काही समस्या उद्भजवण्याची शक्यता असून त्याला विनाकारण मोठे स्वरूप देऊ नये.
हे तंत्रज्ञान कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरळीत चालण्यासाठी तांत्रिक पथकाला पाठिंबा व प्रोत्साहन द्यावे,’’ अशी विनंती सरन्यायाधीश रमणा यांनी केली. महत्त्वाच्या निकालाची थोडक्यात आणि सोप्या भाषेतील माहिती यात देण्यात येणार आहे.
हे वैशिष्ट पत्रकारांसाठी अत्यंत महत्त्वाचा स्रोत ठरणार आहे आणि याद्वारे सामान्य नागरिकांना न्यायालयाच्या निकालांबाबत योग्य माहिती मिळू शकेल,’’ असा विश्वाास त्यांनी व्यक्त केला. वार्तांकन करताना पत्रकारांना मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. न्यायालयीन कामकाजाचे वार्तांकन करताना पत्रकारांना वकिलांवर अवलंबून राहावे लागत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सुनावणीला पत्रकारांना उपस्थित राहता यावे, अशी व्यवस्था करण्याची विनंती करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App