Madras HC Vs EC : सर्वोच्च न्यायालय म्हणाले, हायकोर्टाची भाषा कठोर होती, आयोगानेही आदेशांचं पालन करावं

Supreme Court hearing On Madras HC vs EC Today Latest News

Madras HC Vs EC : विधानसभा निवडणुकांबाबत मद्रास उच्च न्यायालयाने केलेल्या कठोर वक्तव्यांवरून नाराज झालेल्या निवडणूक आयोगाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निर्णय दिला. उच्च न्यायालयांच्या प्रतिक्रिया कठोर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. घटनेनुसार निकालांची आणि खंडपीठाची भाषा संवेदनशील असावी. दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने असेही म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने हे आदेश पाळले पाहिजेत. Supreme Court hearing On Madras HC vs EC Today Latest News


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकांबाबत मद्रास उच्च न्यायालयाने केलेल्या कठोर वक्तव्यांवरून नाराज झालेल्या निवडणूक आयोगाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निर्णय दिला. उच्च न्यायालयांच्या प्रतिक्रिया कठोर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. घटनेनुसार निकालांची आणि खंडपीठाची भाषा संवेदनशील असावी. दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने असेही म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने हे आदेश पाळले पाहिजेत.

निवडणूक सभांमध्ये कोविड प्रोटोकॉल मोडल्यानंतर मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगावर कडक ताशेरे ओढले होते. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेसाठी निवडणूक आयोग जबाबदार असून आयोगाच्या अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे हायकोर्टाने म्हटले होते. या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आयोगाचे म्हणणे होते की, हायकोर्टाच्या या वक्तव्यानंतर माध्यमांकडून आम्हाला खूनी संबोधले जात आहे.

सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट, माध्यमांचे वार्तांकन रोखू शकत नाही

याच विषयावर गुरुवारी न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, दोन घटनात्मक संस्थांमधील शक्तींच्या संतुलनाचा अत्यंत नाजूक प्रश्न उद्भवला आहे. या विषयामुळे भारतातील बोलण्याच्या स्वातंत्र्याचा मोठा मुद्दा उपस्थित झाला आहे. आम्ही माध्यमांना बातम्या देण्यापासून रोखू शकत नाही. दुसरीकडे आम्ही हेदेखील स्पष्ट करत आहोत की, मद्रास उच्च न्यायालय अशा प्रकारच्या टिप्पणी आपल्या निकालात समाविष्ट करू शकत नाही.

या आठवड्यात सोमवारी सुनावणी झाली तेव्हा निवडणूक आयोगाने म्हटले होते की, जेव्हा सभा होत होत्या, तेव्हा परिस्थिती एवढी वाईट नव्हती, म्हणून हायकोर्टाच्या टिप्पणीवर आमचा गंभीर आक्षेप आहे. कोर्टाच्या निरीक्षणानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांत आम्ही मारेकरी असल्याच्या डिबेट झाल्या.

यावर सुप्रीम कोर्टाने म्हटले की, आम्ही माध्यमांना रिपोर्टिंग करण्यापासून रोखू शकत नाही. कधी-कधी आपल्याला त्रास होतो, कारण आम्हाला लोकांचे कल्याण हवे आहे. सलग आदेशानंतरही कारवाई केली नाही, तर उच्च न्यायालयाला त्रास होऊ शकतो.

Supreme Court hearing On Madras HC vs EC Today Latest News

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात