मोदींच्या पंजाब दौर्‍याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची पाच सदस्यीय समिती स्थापन

न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलने या प्रकरणाशी संबंधित सर्व रेकॉर्ड समितीच्या अध्यक्षा इंदू मल्होत्रा ​​यांच्याकडे सोपवावे.Supreme Court forms five-member committee on Modi’s Punjab visit


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंजाबमधल्या फिरोजपूरमध्ये एका उड्डाण पुलावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा अचानक थांबतो. 15 मिनिटं मोदींच्या गाड्या आहे तिथेच उभ्या राहतात.या उड्डाणपुलापासून पाकिस्तानची सीमा अवघ्या 15 ते 20 किलोमीटर अंतरावर होते.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौर्‍यात सुरक्षेत झालेल्या चुकीप्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी सेवानिवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली.ही समिती लवकरच आपला अहवाल सादर करणार आहे.पंतप्रधानांच्या सुरक्षेशी निगडित जप्त करण्यात आलेले सर्व दस्तावेज तातडीने समितीच्या अध्यक्ष न्या. इंदू मल्होत्रा यांना सोपवावे, असा आदेश न्यायासनाने पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांना दिला आहे.

समितीत यांचा आहे समावेश

या समितीमध्ये निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा, डीजी एनआयए, डीजी चंदीगड आणि पंजाबचे सुरक्षा एडीजीपी यांचा समावेश असणार आहे. न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलने या प्रकरणाशी संबंधित सर्व रेकॉर्ड समितीच्या अध्यक्षा इंदू मल्होत्रा ​​यांच्याकडे सोपवावे.

Supreme Court forms five-member committee on Modi’s Punjab visit

महत्त्वाच्या बातम्या