हेरगिरी प्रकरणात शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांना अडकविणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचीही होणार ‘सीबीआय’ चौकशी


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : ‘इस्रो’त १९९४ मध्ये घडलेल्या कथित हेरगिरी प्रकरणात शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांना अडकविणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची ‘सीबीआय’ चौकशी करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.Supreme court directs CBI inquiry in ISRO case

यावर तीन महिन्यांत अहवाल दाखल करण्याचे निर्देशही ‘सीबीआय’ला दिले. या प्रकरणी चूक करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेसंबंधी उच्चस्तरीय समितीच्या अहवालावर विचार करून न्यायालयाने हे निर्देश दिले.



यातील संशयित आरोपी नारायणन यांची सर्वोच्च न्यायालयाने आधीच सुटका केलीअसून नाहक मानहानी केल्याने ५० लाख रुपये भरपाई देण्याचा आदेशही केरळ सरकारला दिला आहे. ‘इस्रो’तील हेरगिरीचा तपास करणारे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश डी. के. जैन यांच्या

अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीचा अहवाल प्राथमिक तपास अहवालाच्या स्वरूपात स्वीकारण्याचा आदेश ‘सीबीआय’च्या संचालकांना दिला आहे. तसेच हा अहवाल लगेच प्रसिद्ध न करण्याची सूचनाही दिली आहे.

Supreme court directs CBI inquiry in ISRO case

इतर बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात