वृत्तसंस्था
मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा आकस्मिक अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालघर जिल्हा अधीक्षकांनी ही माहिती दिली आहे. Sudden accidental death of senior industrialist Cyrus Mistry
कोण होते सायरस मिस्त्री?
सायरस मिस्त्री यांची ऑक्टोबर २०१६मध्ये टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून हकालपट्टी केली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी मिस्त्री यांच्यावतीने त्याच्या परिवारातील ‘सायरस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्प’ने ‘टाटा सन्स’च्या निर्णयाविरुद्ध ‘एनसीएलटी’च्या मुंबई खंडपीठात दावा दाखल केला. या कंपन्यांच्या मते ‘टाटा सन्स’च्या चेअरमनपदावरून मिस्त्री यांची करण्यात आलेली हकालपट्टी कंपनी कायद्याला धरून नव्हती. त्यांनी ‘टाटा सन्स’च्या व्यवस्थापनावर आणि रतन टाटा यांच्यावरही आरोप केले.
Ratan Tata म्हणाले, मला भारतरत्न देण्याची मोहीम थांबवा, देशाची सेवा करता येणे हे माझे भाग्यच!
टाटा चेअरमन वाद
मात्र, जुलै २०१८मध्ये ‘एनसीएलटी’ने त्यांचा दावा रद्दबातल ठरवला. त्यानंतर मिस्त्री यांनी ‘एनसीएलएटी’मध्ये दावा दाखल केला. ‘एनसीएलटी’ने ९ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निर्णयात ‘टाटा सन्स’च्या संचालक मंडळाला मिस्त्री यांना चेअरमन पदावरून हटविण्याचे अधिकार असल्याचे म्हटले होते. कंपनीच्या समभागधारकांचा आणि संचालक मंडळाचा त्यांच्यावरील विश्वास डळमळीत झाल्यामुळे त्यांना पदावरून हटविण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले. २०१२मध्ये रतन टाटा यांनी निवृत्ती स्वीकारल्यानंतर सायरस मिस्त्री टाटा सन्सच्या सहावे चेअरमनपदी नियुक्त झाले होते.
उद्योगपती सायरस मिस्त्रींचा प्रवास
सायरस मिस्त्री यांचा जन्म मुंबईत पारसी कुंटुंबात झाला. उद्योगपती पालनजी मिस्त्री यांचे ते धाकटे सुपूत्र होते. सायरस मिस्त्री यांनी सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून घेतले. त्यांनी 1990 मध्ये लंडन विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंग केले आणि त्यानंतर 1996 मध्ये लंडन विद्यापीठातून लंडन बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले. सायरस मिस्त्री यांच्या पत्नीचे नाव रोहिका छागला आहे. त्यांना फिरोज मिस्त्री आणि जहान मिस्त्री अशी दोन मुले आहेत.
सायरस मिस्त्री हे 2006 साली टाटा समुहाचे सदस्य बनले. 2012 साली वयाच्या 43 व्या वर्षी टाटा समुहाचे अध्यक्ष बनले. परंतु, 2016 साली वादानंतर मिस्त्री यांना टाटाच्या अध्यक्षपदावरुन हटवले. नुकसानीमध्ये असलेल्या परदेशी कंपन्यांमध्ये भागिदारी विकल्याचा मिस्त्रींवर आरोप होता. यानंतर त्यांना पदावरुन हटवण्यात आलं. सायरस मिस्त्री आणि टाटा समुहामधील वाद न्यायालयापर्यंत पोहोचला होता. सायरस मिस्त्री यांनीं शापूरजी पालनजी समुहाचे मॅनेजिंग डायरेक्टर पद देखील भूषवले होते. मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यातील मृतांसह जखमींना टाटा समुहाने मोठी मदत केली होती. ही मदत मिळवून देण्यात सारयस यांचा मोठा वाटा होता.
व्यवसायाचा विस्तार
पालनजी मिस्त्री ग्रुपचा व्यवसाय कापडापासून रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस ऑटोमेशनपर्यंत पसरलेला आहे. SPG समुहामध्ये शापूरजी पालोनजी अभियांत्रिकी आणि बांधकाम, Afcons इन्फ्रास्ट्रक्चर, Forbes Textiles, Gokak Textiles, Eureka Forbes, Forbes & Co, SP Construction Materials Group, SP रिअल इस्टेट आणि नेक्स्ट जेन सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
कौटुंबिक वारसा
सायरस मिस्त्री यांचे आजोबा शापूरजी मिस्त्री यांनी 1930 मध्ये त्यांचा कौटुंबिक व्यवसाय सुरू केला. आणि त्याच वेळी त्यांनी दोराबजी टाटा यांच्याकडून टाटा समूहातील भागभांडवल विकत घेतले होते. त्यांनी टाटा समूहातील 18.5 टक्के हिस्सा खरेदी केला होता. मिस्त्री कुटुंब हे एकमेव कुटुंब आहे ज्यात त्यांनी टाटा समूहात भागीदारी केली आहे. याशिवाय 66 % हिस्सा टाटा समूहाच्या विविध ट्रस्टकडे आहे. सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे सहावे चेअरमन होते.
Sudden accidental death of senior industrialist Cyrus Mistry
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App