Ratan Tata said, stop the campaign to give me Bharat Ratna, it is my good fortune to be able to serve the country

Ratan Tata म्हणाले, मला भारतरत्न देण्याची मोहीम थांबवा, देशाची सेवा करता येणे हे माझे भाग्यच!

जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न देण्याच्या मागणीसंदर्भात सोशल मीडियावर मोहीम सुरू आहे. यावर रतन टाटांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, मला भारतरत्न देण्यात यावा या लोकांच्या भावनेचे कौतुक वाटते. पण अशी मोहीम थांबवली पाहिजे. रतन टाटा यांनी ही प्रतिक्रिया एका ट्वीटद्वारे दिली आहे. Ratan Tata said, stop the campaign to give me Bharat Ratna, it is my good fortune to be able to serve the country


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांना भारतरत्न देण्याच्या मागणीसंदर्भात सोशल मीडियावर मोहीम सुरू आहे. यावर रतन टाटांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, मला भारतरत्न देण्यात यावा या लोकांच्या भावनेचे कौतुक वाटते. पण अशी मोहीम थांबवली पाहिजे. रतन टाटा यांनी ही प्रतिक्रिया एका ट्वीटद्वारे दिली आहे.

ट्विटरवर या मोहिमेसाठी #BharatRatnaForRatanTata हॅशटॅगदेखील ट्रेंडिंगमध्ये आहे. आता खुद्द रतन टाटा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. स्वत: ला भारतीय म्हणून भाग्यवान मानत त्यांनी मोहीम बंद करण्यास सांगितले आहे.

रतन टाटा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट केले आहे की, ‘सोशल मीडियावर मला भारतरत्न देण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या भावनांचा मी आदर करतो, पण अशी मोहीम बंद करावी, अशी मी नम्र विनंती करतो. मी स्वत:ला सुदैवी भारतीय मानतो आणि भारताच्या विकास आणि समृद्धीसाठी हातभार लावणे माझे भाग्य मानतो.’तथापि, ट्विटरवर रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी करताना अनेक युजर्सने म्हटलेय की, तेच भारताचे खरे रत्न आहे. म्हणून त्यांना हा सर्वोच्च सन्मान मिळालाच पाहिजे.

Ratan Tata said, stop the campaign to give me Bharat Ratna, it is my good fortune to be able to serve the country

ट्विटरवर युजर्सच्या एका मोठ्या समूहाने रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची जोरदार मागणी केली आहे. यासाठी सोशल मीडियावरही एक विशेष मोहीम सुरू आहे. सोशल मीडिया लोकांच्या मागण्या समोर आणण्याचा एक चांगला मार्ग बनला आहे. आता लोक ट्विटरवर सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी करत आहेत. यामुळे शुक्रवारी ट्विटरवर हा विषय ट्रेंड होऊ लागला.

 Ratan Tata said, stop the campaign to give me Bharat Ratna, it is my good fortune to be able to serve the country

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*