वृत्तसंस्था
नवी दिल्ली : स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 125 वी जयंती आहे. केंद्र सरकारनं सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवसापासून प्रजासत्ताक दिवस साजर करण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. नेताजी बोस यांची जयंती यावर्षीपासून पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाणार आहे.
आज संसदेत सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्ली येथील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.
सभी देशवासियों को पराक्रम दिवस की ढेरों शुभकामनाएं। नेताजी सुभाष चंद्र बोस की 125वीं जयंती पर उन्हें मेरी आदरपूर्ण श्रद्धांजलि। I bow to Netaji Subhas Chandra Bose on his Jayanti. Every Indian is proud of his monumental contribution to our nation. pic.twitter.com/Ska0u301Nv — Narendra Modi (@narendramodi) January 23, 2022
सभी देशवासियों को पराक्रम दिवस की ढेरों शुभकामनाएं।
नेताजी सुभाष चंद्र बोस की 125वीं जयंती पर उन्हें मेरी आदरपूर्ण श्रद्धांजलि।
I bow to Netaji Subhas Chandra Bose on his Jayanti. Every Indian is proud of his monumental contribution to our nation. pic.twitter.com/Ska0u301Nv
— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2022
नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचा फोटो देखील जारी केला होता. जोपर्यंत पुतळा तयार होत नाही तोपर्यंत नेताजी बोस यांची होलोग्राम स्वरुपातील प्रतिमा तिथं असेल. नरेंद्र मोदी आज त्या प्रतिमेचं अनावरण करणार आहेत. होलोग्राफिक हे डिजीटल तंत्र आहे. हे प्रोजेक्टर सारखं काम करतं. यामध्ये कोणतिही गोष्टी थ्रीडी स्वरुपात दाखवता येते. आपण समोर पाहत असलेली गोष्ट खरी असल्याचा भास होतो पण आपण थ्री़डी इमेज पाहत असतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App