फेरीवाले, विक्रेतेही आत्मनिर्भर, केंद्र सरकारकडून ३०.७५ लाख कर्जांना मंजुरी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या पीएम विक्रेते/फेरीवाले आत्मनिर्भर निधी योजनेमुळे कर्ज मिळणे सोपे झाले आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत ३०.७५ लाख कर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ३०.७५ लाख विक्रेत्यांना ३,०९५ कोटी रुपयांचे व्यावसायिक कर्ज मिळणार आहे.Street vendors, sellers also self-reliant, 30.75 lakh loans sanctioned by Central Government

यापैकी २७.०६ लाख कर्ज प्रकरणांचे २,७१४ कोटी रुपये वितरीत देखील करण्यात आले आहेत. कर्ज वितरीत झालेल्या २७.०६ लाख लाभार्थींपैकी ५९ टक्के पुरुष, तर ४१ टक्के महिला आहेत.



केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत महाराष्ट्रात एकूण २ लाख २२ हजार ७१४ कर्ज प्रकरणांमध्ये २२४ कोटी २४ लाख ८५ हजार २६० रुपये कर्ज मंजूर झाले. यापैकी १ लाख ८७ हजार ५०२ कर्ज प्रकरणांमधील १८८ कोटी २१ लाख ५० हजार २६३ रुपये वितरीत देखील झालेत. यात पुरुषांची संख्या १ लाख १४ हजार ७०६ आणि महिलांची संख्या ७२ हजार ७९१ इतकी आहे.

या योजनेंतर्गत आलेल्या अर्जांपैकी एकूण ६ लाख ७५ हजार ४९८ प्रकरणं बँकेने नामंजूर केली आहेत. यात ७१ हजार १६४ प्रकरणांमध्ये विक्रेत्यांना कर्ज घेण्यात रस नव्हता, २ लाख ९० हजार २०९ प्रकरणांमध्ये विक्रेते कजार्ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उपलब्ध झाले नाहीत. याशिवाय इतर कारणांनी ३ लाख १४ हजार १२५ प्रकरणांचे अर्ज परत करण्यात आले

Street vendors, sellers also self-reliant, 30.75 lakh loans sanctioned by Central Government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात