चीनच्या ई कॉमर्स क्षेत्रात वादळ, अलिबाबातून दहा कर्मचाऱ्यांची हकालपट्टी; कंपनीतील अत्याचाराची घटना जगजाहीर केल्याने कारवाई

वृतसंस्था

शांघाय : चीनमधील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी मानल्या गेलेल्या अलिबाबामधून दहा कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केल्यामुळे चीनच्या ई कॉमर्स क्षेत्रात वादळ निर्माण झाले आहे. या कर्मचाऱ्यांनी कंपनीतील अत्याचाराची एक घटना जगजाहीर केली. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. Storm in China’s e-commerce sector, expulsion of ten employees from Alibaba; Action against the company for publicizing the incident of sexual harresh

अलिबाबा कंपनीच्या माजी व्यवस्थापकावर लैगिक छळ केल्याचा आरोप तेथे काम करणाऱ्या महिलेने केला होता. हकालपट्टी केलेल्या कर्मचाऱ्यांनी या संदर्भातील कागदपत्रे आणि स्क्रीन शॉट्स हे सार्वत्रिक केले. त्यामुळे अलिबाबा कंपनीची इज्जत चव्हाट्यावर आल्याने ही कारवाई केली आहे. या घटनेमुळे चीनच्या इ कॉमर्स क्षेत्रात नव्या वादाला आमंत्रण मिळाले आहे.कार्पोरेट क्षेत्रातील अत्याचाराचा झाल्यानंतर संबंधित महिलेने तक्रार केली होती. त्यानंतर अलिबाबा कंपनीने दोषी व्यवस्थापकाची हकालपट्टी केली होती.तसेच दोन ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे राजीनामे घेतले होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल झांग यांनी कबूल केले की, कंपनीतील घटना अतिशय ‘अपमानास्पद ‘ होती. महिलेला ग्राहकांबरोबर मद्यपान करण्यास भाग पाडले आणि नंतर अत्याचार केला. या नंतर तिला अधिक त्रास देण्याच्या उद्देशाने याबाबतची माहिती सार्वजनिक केली. ही बाब अतिशय दुर्दैवी आहे.असे कृत्य करणाऱ्या १० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली.

दोन आठवड्यापूर्वी ही घटना घडली होती. कंपनीत याची अंतर्गत चौकशी सुरु होती. दरम्यान , गेल्या आठवड्यात चिनी पोलिसांनी या प्रकरणात पहिली अटक केली होती, जिनान हुआलियन सुपरमार्केटच्या एका माजी कर्मचाऱ्याने झांग हा झोउ या पीडित महिलेबरोबर डिनरला होता. तिचे माजी व्यवस्थापक वांग या आडनावाचे आहेत. त्यांची अत्याचार केल्याच्या संशयावरून पोलिसांनी चौकशी सुरु केली होती.

Storm in China’s e-commerce sector, expulsion of ten employees from Alibaba; Action against the company for publicizing the incident of sexual harresh

महत्त्वाच्या बातम्या