सरकारला जाग येऊ दे, नटराजाकडे कलाकारांची प्रार्थना


विशेष प्रतिनिधी

पुणे : मायबाप सरकार… रोजगार वाचवा, नाट्यगृह सुरू करा, अशी मागणी नाट्य चित्रपट कलाकारांनी सरकारकडे केली आहे.सरकारला जाग येऊ दे अशी प्रार्थना नटराजकडे केली.कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्य सरकारने बहुतांश निर्बंध शिथिल केले आहेत.Let the government wake up, artists pray to Nataraja

परंतु राज्यातील नाट्यगृह आणि चित्रपटगृह मात्र सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. या उद्योगावर अवलंबून असलेल्या कलाकारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांचे आर्थिक हाल होत आहेत. राज्य सरकारचे या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातील कलाकारांनी बालगंधर्व रंगमंदिरात नटराजाची महाआरती करून सरकारला जाग येऊ दे अशी प्रार्थना केली.



राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एक सप्टेंबरपासून नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. सरकारला जाग येणे गरजेचे असल्याने त्याकरिता जागरण-गोंधळाचे आयोजन पुण्यात करण्यात आलं होतं. यावेळी अभिनेत्री प्रिया बेर्डे, अभिनेते गिरीश ओक, अभिनेत्री सुरेखा कुडची यांच्यासह अनेक कलाकार सहभागी झाले होते.

या सरकारला आमची बाजू समजली पाहिजे. त्यामुळेच या महाआरतीचे आयोजन केले होते. सरकारने कलाकारांच्या मागण्या मान्य कराव्यात. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी. नाट्यगृह सुरू करून कलाकारांना न्याय द्यावा अशी कलाकारांनी केली.

नाटक व्हर्चुअल किंवा ऑनलाईन माध्यमातून होऊ शकत नाही. प्रत्यक्ष रंगमंचावर काम करणाऱ्या कलाकारांना प्रेक्षक समोर लागतात. कलाकारांची कुचंबणा होऊ नये. या व्यवसायावर आणि त्यांचे पोट अवलंबून असल्याचेही कलाकार यावेळी म्हणाले.

Let the government wake up, artists pray to Nataraja

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात