विशेष प्रतिनिधी
पाटणा : दारू पिणाºया लोकांना मी भारतीय मानत नाही, असे लोक महापापी आहेत, असे वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले आहे. बिहारमध्ये दारूबंदी कायद्याबाबत विधानसभेत संशोधन विधेयक मंजूर करून अनेक मोठे बदल करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हे वक्तव्य केले आहे.Statement of Nitish Kumar, a big sinner, not an Indian who drinks alcohol
नितीश कुमार दारूबंदीचे महत्व सांगताना म्हणाले, जे लोक बापूंच्या भावनांना न मानता दारूचं सेवन करतात, अशा लोकांना मी भारतीय मानत नाही. असे लोक पात्र तर नाहीतच, पण ते महा-अयोग्य आणि महापापी आहेत. दारू पिणं हे कोणत्याच दृष्टीकोनातून चांगलं नाही. जगभरात दारूचा विपरीत परिणाम दिसत आहे.
बिहारमध्ये दारूबंदीमुळे सरकारला आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करणाºयांनाही नितीश कुमार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. दारूची विक्री सुरू होती तेव्हा ५ हजार कोटी रुपयांचा कर मिळत होता, मात्र दारूबंदी झाल्यामुळे लोकांना इतर अनेक फायदेही झाले आहेत, असं ते म्हणाले.
दारूबंदी झाल्यामुळे आधी जे लोक दारू पित होते ते लोक आता पालेभाज्या खरेदी करू लागले आहेत. लोकांचे पैसेही वाचत आहेत आणि लोकांच्या आरोग्यातही सुधारणा झाली आहे, असा दावा नितीश कुमार यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App