वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नामवंत व्यक्तींचे मार्गदर्शन मिळावे, त्यांच्याशी संवाद साधण्याची या मुलांना संधी मिळावी या दृष्टीने आम आदमी पक्षाच्या सरकारने ‘देश के मेंटॉर’ ही योजना राबविण्याचे ठरवले आहे. या योजनेचा ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून अभिनेता सोनू सूद हा काम करणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज याबाबतची घोषणा केली. स्थलांतरित मजुरांना मदत करणाऱ्यांत सोनू सूद आघाडीवर होता. sonu sud became brand ambesedor for delhi govt.
केजरीवाल यांनी सांगितले, सोनू सूद दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तो मार्गदर्शन करेल. सोनू सूद कोरोना काळात अनेक जणांना सक्रिय मदत करत आहे. अनेक सरकारेही जे करु शकली नसती ते सूद याने केले. लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने लाखो गरिबांना मदत केली. दिल्ली सरकारच्या आगामी योजनेत त्याच्यामुळे फार मदत होईल.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेले किमान पाच महिने दिल्लीत शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत. शैक्षणिक उपक्रम पुन्हा सुरू करण्याची हालचाल आहे. दिल्ली सरकारने नेमलेल्या तज्ञ समितीने पुन्हा शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. पुन्हा शाळा सुरू होतील तेव्हा ‘देश के मेंटॉर’ या कार्यक्रमाद्वारे एक नवीन उपक्रम राबवण्याचा सरकारचा मानस आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App