विशेष प्रतिनिधी
मोगा : पंजाबमध्ये मतदानादरम्यान मोगा पोलिसांनी बहिणीचा प्रचार करण्यासाठी गेलेल्या अभिनेता सोनू सूदची कार जप्त केली आहे. सोनू सूद दुसºया मतदान केंद्रावर गेल्याचा आरोप अकाली दलाने निवडणूक आयोगाकडे केला आहे. या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने सूचना दिल्या, त्यानंतर मोगा पोलिसांनी कारवाई केली आहे. सोनू सूद हा आपल्या मतदान केंद्रानंतर इतर मतदान केंद्रांवरही जात असल्याची तक्रार अकाली दलाने केली होती.Sonu Sood, who went to her sister’s campaign, police take action
सोनू सूद हा इतर मतदान केंद्रांमध्ये जात होता. यामुळे त्याची कार जप्त करण्यात आली आहे. त्याला घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तरीही सोनू सूद घराबाहेर पडल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती मोगा जिल्ह्याचे जनसंपर्क अधिकारी प्रदीप सिंह यांनी दिली.
अकाली दलाच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने सोनूवर कारवाई केली आहे. पोलिसांनी सोनू सूदची कारव जप्त केली आहे. यामुळे सोनू सूदला दुसºया वाहनातून जावे लागले. सोनू सूदची बहीण मालविका सूद या मोगा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. काँग्रेसने मालविका यांना मोगामधून उमेदवारी दिली आहे.
अनेक मतदान केंद्रांवर विरोधी पक्षांकडून आम्हाला धमकीचे फोन आले. खासकडून अकाली दलाच्या नेत्यांकडून धमक्या दिल्या गेल्या. काही मतदान केंद्रांवर त्यांनी पैसेही वाटले. यामुळे मतदान केंद्रांवर जाऊन तपासणी करणं आणि निर्भय वातावरणात मतदान होईल, पाहणं आमचं काम आहे. यामुळे आम्ही तिथे गेलो होतो. पण आता आम्ही घरी आहोत. पण मतदान प्रक्रिया ही नि:पक्षपणे व्हायला हवी, असं सोनू सूद म्हणाला.
मोगामध्ये इतर पक्षांचे उमेदवार मतांसाठी पैसे वाटत असल्याचा आरोप सोनू सूदने याआधी केला होता. सोनू सूदने ट्विटरवरून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. मोगामध्ये इतर उमेदवार मते विकत घेत आहेत. निवडणूक आयोगाने याप्रकरणी तातडीने कारवाई करावी’, अशी मागणी सोनू सूदने ट्विट करून केली. सोनू सूदने ट्विटमध्ये मोगाचे जनसंपर्क कार्यालय आणि पोलिसांनाही टॅग केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App