सोनिया – राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत असे घडले तर… हेमंत विश्व शर्मा आणि एम. एस. बिट्टा काय म्हणाले??

वृत्तसंस्था

गुवाहटी /चंडीगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिरोजपूर दौऱ्यात सुरक्षाव्यवस्थेत जी ढिलाई दाखवण्यात आली त्यावरून भारतीय राजकारणात अक्षरशः धुमश्चक्री सुरू आहे या पार्श्‍वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा आणि पंजाब मधले काँग्रेसचे नेते मनिंदरजित सिंग बिट्टा या दोघांनी समानच वक्तव्य केले आहे.Sonia – If this happens to Rahul Gandhi’s security … Hemant Vishwa Sharma and M. S. What did Bitta say

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत ढिलाई दाखवण्यात येते त्याविषयी माफी मागण्याऐवजी पंजाब सरकारचे समर्थनही केले जाते. पण काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी हे आमच्या राज्यात असाममध्ये आले आणि त्यांच्या सुरक्षेत अशी ढिलाई झाली तर चालेल का?,



असा खोचक सवाल मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी काँग्रेसला केला आहे. पण सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे असाममध्ये आल्यावर आसामचे सरकार पंजाब सरकार सारखी वर्तणूक ठेवणार नाही, अशी ग्वाही देखील विश्वशर्मा यांनी दिली.

याच स्वरूपाचे वक्तव्य पंजाब मध्ये काँग्रेसचे नेते मनिंदरजित सिंग बिट्टा यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षा व्यवस्था ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामध्ये ढिलाई होता कामा नये. पंजाब सरकारने जबाबदारी निश्चित करून कारवाई केलीच पाहिजे. हेच जर सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांच्या सुरक्षेच्या बाबतीत झाले असते

तर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यावर सवाल उठवले नसते का?, अशा शब्दात बिट्टा यांनी आपल्याच पक्षातल्या नेत्यांना टोचले आहे. पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था किंवा अति महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा व्यवस्था ही पक्षाच्या पलीकडची बाब आहे हा मुद्दा हेमंत विश्वशर्मा आणि बिट्टा या दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केला आहे.

Sonia – If this happens to Rahul Gandhi’s security … Hemant Vishwa Sharma and M. S. What did Bitta say

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात