वृत्तसंस्था
नवी दिल्ली : “आम्ही जी हुजूर 23 नाही,” असा घात काँग्रेस हायकमांड वर करणाऱ्या कपिल सिब्बल यांच्यावर काँग्रेस हायकमांडचे समर्थक नेते अजय माकन यांनी प्रतिघात केला आहे.Sonia Gandhi ji had ensured that Kapil Sibal becomes a minister in Union Cabinet despite not having organizational background.
कपिल सिब्बल यांना सोनिया गांधी यांनी कोणतीही संघटनात्मक पार्श्वभूमी नसताना केंद्रात मंत्री केले. त्यांना सन्मान दिला. पण आज हेच सिब्बल आणि त्यांच्यासारखे नेते काँग्रेस संघटनेला नावे ठेवत आहेत, अशा शब्दांत अजय माकन यांनी सिब्बल आणि जी 23 नेत्यांवर सडकून टीका केली.
अजय माकन म्हणाले, की काँग्रेस मध्ये सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे ऐकून घेतले जाते. कोणतेही निर्णय संघटनेला अंधारात ठेवून घेतले जात नाहीत. तरी देखील सिबल यांच्यासारखे नेते संघटनेविषयी शंका निर्माण करतात हे योग्य नसल्याचे अजय माकन यांनी सुनावले.
Sonia Gandhi ji had ensured that Kapil Sibal becomes a minister in Union Cabinet despite not having organizational background. Everyone in the party is being heard.Want to tell Mr Sibal&others that they shouldn't degrade the organization that gave them an identity:Ajay Maken,Cong pic.twitter.com/HB1PhumN5V — ANI (@ANI) September 29, 2021
Sonia Gandhi ji had ensured that Kapil Sibal becomes a minister in Union Cabinet despite not having organizational background. Everyone in the party is being heard.Want to tell Mr Sibal&others that they shouldn't degrade the organization that gave them an identity:Ajay Maken,Cong pic.twitter.com/HB1PhumN5V
— ANI (@ANI) September 29, 2021
कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना सध्याच्या काँग्रेस मधल्या बंडाळीच्या पार्श्वभूमीवर ताबडतोब काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलविण्याची मागणी करणारे पत्र लिहिले आहे. त्याच वेळी कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस हायकमांडवर टीकेची झोड उठविली आहे. काँग्रेस हायकमांडला जे आपल्या जवळचे नेते वाटत होते, ते त्यांना सोडून निघून गेले. पण आम्ही काँग्रेसची विचारसरणी आणि काँग्रेस सोडणारी माणसे नव्हेत, असे त्यांनी सुनावले आहे.
एक प्रकारे काँग्रेसमधल्या संघटनात्मक पातळीवरच्या मतभेदाचे प्रदर्शन कपिल सिब्बल यांनी दिल्लीत घडविले आहे. पंजाब मध्ये पक्षात मोठ्या प्रमाणावर बंडाळी आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री बदलून देखील तिथे पक्षातली अस्वस्थता संपली नाही. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग अमित शहा यांच्या भेटीला गेले आहेत. या पार्श्वभूमीवर सिब्बल यांनी काँग्रेस हायकमांडवर टीकेची झोड उठविली. त्याला अजय माकन यांनी प्रत्युत्तर दिल्याने काँग्रेस हायकमांड देखील जी 23 नेत्यांचे किंवा बंडखोर नेत्यांचे ऐकणार नाही हा स्पष्ट संदेश देण्यात आल्याचे मानण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App