Sonia Gandhi Calls AICC Meeting : कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 24 जून रोजी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीची (एआयसीसी) बैठक बोलावली आहे. एआयसीसीचे सरचिटणीस आणि राज्य प्रभारी यांना ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यास सांगण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सानिया गांधींना सद्य राजकीय परिस्थितीविषयी चर्चा करायची आहे. इकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे 15 भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या तयारीला लागले आहेत. यूपीएपेक्षा वेगळा पर्याय यातून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी त्यांनी मंगळवारी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी बैठकही बोलावली आहे. या बैठकीत काँग्रेस आमंत्रण नसल्याची चर्चा आहे. यामुळे सोनिया गांधींनीही आता 24 जून रोजी काँग्रेस कमिटी व विविध राज्यांचे प्रभारी यांच्यासमवेत सद्य: राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. Sonia Gandhi Calls AICC Meeting On 24th June On Current Political Situation
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 24 जून रोजी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीची (एआयसीसी) बैठक बोलावली आहे. एआयसीसीचे सरचिटणीस आणि राज्य प्रभारी यांना ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यास सांगण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सानिया गांधींना सद्य राजकीय परिस्थितीविषयी चर्चा करायची आहे. इकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे 15 भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या तयारीला लागले आहेत. यूपीएपेक्षा वेगळा पर्याय यातून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी त्यांनी मंगळवारी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी बैठकही बोलावली आहे. या बैठकीत काँग्रेस आमंत्रण नसल्याची चर्चा आहे. यामुळे सोनिया गांधींनीही आता 24 जून रोजी काँग्रेस कमिटी व विविध राज्यांचे प्रभारी यांच्यासमवेत सद्य: राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.
कॉंग्रेसचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग 22 जून रोजी एआयसीसीच्या पॅनेल सदस्यांची भेट घेणार आहेत. यासाठी पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी पक्षाच्या नेतृत्वाखालील गटात गटबाजी रोखण्यासाठी एकमताने फॉर्म्युला शोधण्यात मदत होईल. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी जूनच्या सुरुवातीला सोनिया गांधी यांनी स्थापन केलेल्या तीन सदस्यांच्या पॅनेलची भेट घेतली होती. वास्तविक, पार्टी हाय कमांड अमरिंदरसिंग आणि नवजोतसिंग सिद्धू यांच्यातील दरी कमी करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. समितीने पक्षाचे आमदार, खासदार आणि इतर नेत्यांची भेट घेतली त्यानंतर पॅनेल सदस्यांनी सोनिया गांधी यांना अहवाल सादर केला.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक खळबळ उडालेली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सातत्याने स्वबळाची भाषा बोलत आहेत. यावर सत्तेतील मित्रपक्षांकडूनही विविध प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना वर्धापन दिनानिमित्त केलेल्या भाषणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकांची कामे सोडून स्वबळ करायला लागलो तर लोक जोडे हाणतील, असा इशारा दिला होता. यामुळे महाविकास आघाडीतही आलबेल नाही, हे स्पष्ट होते. दुसरीकडे, खुद्द शिवसेनेचेच आमदार प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याची विनंती केली आहे. यामुळे शिवसेन पुन्हा भाजपसोबत जाते की काय, अशी भीती इतर दोन्ही पक्षांना आहे.
यूपीएच्या अध्यक्षा म्हणून सोनिया गांधींकडेच नेतृत्व आहे. तथापि, भाजपविरोधात यूपीए अपयशी ठरली. दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपला संपूर्ण ताकदीनिशी झुंज देऊन सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. यामुळे आता इतर पक्षांनीही ममतांच्या यशामुळे राष्ट्रीय स्तरावर भाजपचा विजयी रथ रोखण्याचे प्रयत्न चालवले आहेत. याला पर्याय म्हणून राष्ट्र मंचकडे पाहिले जात आहे. भाजपमधून बाहेर पडलेल्या यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रमंचची स्थापना केली होती. शरद पवार यांनी पंधरा दिवसांत दोन वेळा प्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार प्रशांक किशोर यांची भेट घेतली. यानंतर आता भाजपविरोधी पक्षांची बैठकही बोलवली आहे. यामुळे या बैठकीकडे 2024ची रणनीती म्हणून पाहिले जात आहे. शरद पवारांच्या नेतृत्वात तिसरा पर्याय उभा राहिला तर यूपीएचे काय होईल, हाही प्रश्न आहेच. यामुळेच आता या बैठकांमध्ये काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sonia Gandhi Calls AICC Meeting On 24th June On Current Political Situation
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App