Solar Eclipse 2021 : वर्षातील पहिले सूर्यग्रहण आज दुपारी 1.42 वाजता, भारतात कुठे-कुठे दिसणार जाणून घ्या!

solar eclipse 2021 is today it will visible only in ladakh and arunachal pradesh in india

Solar Eclipse 2021 : या वर्षातील पहिले सूर्यग्रहण 10 जून 2021 रोजी गुरुवारी दुपारी 1.42 वाजता सुरू होईल. जे संध्याकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी संपेल. हे वलयाकार सूर्यग्रहण असेल. सूर्यग्रहण ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून एक खगोलीय घटना आहे. जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात, तेव्हा ही घटना घडते. या वेळी हे सूर्यग्रहण एक संपूर्ण वलयाकार सूर्यग्रहण असेल. यामध्ये चंद्राची सावली अशा प्रकारे सूर्यावर पडेल की सूर्याच्या मध्यभागचा संपूर्ण भाग व्यापला जाईल, परंतु सूर्याच्या बाहेरील भाग अंगठीच्या आकारात प्रकाशित होईल. solar eclipse 2021 is today it will visible only in ladakh and arunachal pradesh in india


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : या वर्षातील पहिले सूर्यग्रहण 10 जून 2021 रोजी गुरुवारी दुपारी 1.42 वाजता सुरू होईल. जे संध्याकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी संपेल. हे वलयाकार सूर्यग्रहण असेल. सूर्यग्रहण ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून एक खगोलीय घटना आहे. जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात, तेव्हा ही घटना घडते. या वेळी हे सूर्यग्रहण एक संपूर्ण वलयाकार सूर्यग्रहण असेल. यामध्ये चंद्राची सावली अशा प्रकारे सूर्यावर पडेल की सूर्याच्या मध्यभागचा संपूर्ण भाग व्यापला जाईल, परंतु सूर्याच्या बाहेरील भाग अंगठीच्या आकारात प्रकाशित होईल.

भारताच्या या राज्यांमधून दिसून येईल

हे सूर्यग्रहण भारतातील केवळ दोनच राज्यांमधून- अरुणाचल प्रदेश आणि लडाखच्या काही भागात दिसून येईल. या भागांमध्ये हे सूर्यग्रहण सूर्यास्ताच्या अगदी आधी दिसू शकेल.

सन 2021 चे हे पहिले सूर्यग्रहण अरुणाचल प्रदेशातील दिबंग वन्यजीव अभयारण्याजवळून सायंकाळी 5.52 वाजता दिसेल. तर लडाखच्या उत्तरेकडील भागात ते संध्याकाळी 06 वाजता दिसू शकते. येथील सूर्यास्त संध्याकाळी 06.15च्या सुमारास असेल.

या देशांमध्ये दिसेल सूर्यग्रहण

वर्षाचे पहिले सूर्यग्रहण मुख्यतः उत्तर अमेरिका, युरोप आणि आशियाच्या मोठ्या भागांमधून दिसून येईल.

solar eclipse 2021 is today it will visible only in ladakh and arunachal pradesh in india

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात