Social Media Trends; सिंधू, हॉकीतल्या विजयानंतर देशाचा मूड “अप बीट” विरोधक मात्र डाउन ट्रेंड…!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पी. व्ही. सिंधू हिने बॅडमिंटनमध्ये टोकिया ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक मिळवले. महिलांच्या हॉकी टीमने तीन वेळेच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला हरवून ऑलिंपिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. यामुळे संपूर्ण भारताचा मूड “अप बीट” झाला असून सोशल मीडियावर भारतीय महिला हॉकी टीम, पी. व्ही. सिंधू प्रचंड ट्रेंडिंगमध्ये आहेत. याउलट संसदेत गोंधळ घालणारे काँग्रेससह सर्व विरोधक डाउन ट्रेंड झालेले दिसत आहेत. Social Media Trends; Sindhu, after the victory in hockey, the mood of the country is “up beat” but the down trend … !!



गेल्या चोवीस तासांत पासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर, फेसबुक, इन्स्टा यांच्यावर टोकियो ऑलिंपिकमधली भारताची कामगिरी, त्यातही महिला हॉकी टीम, पी. व्ही. सिंधू कमल जीत कौर यांचीच जबरदस्त चर्चा आहे. भारताची महिला शक्ती किती प्रबळ आहे, याविषयी सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारने देखील या सोशल ट्रेंडची दखल घेतली आहे. त्यामुळेच केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ऑलिम्पिकमध्ये महिलांची कामगिरी उंचावल्या नंतर जे ट्विट केले, त्यामध्ये त्यांनी भारतीय महिलांनी ऑलिम्पिकमध्ये जे उत्तम प्रदर्शन केले त्यामुळे भारताच्या “बेटी बचाव बेटी पढाव” या मोहिमेला बळ मिळेल, असे म्हटले आहे. भारतीय महिला क्रीडापटूंचा जागतिक पातळीवरचा बोलबाला केंद्र सरकारच्या लक्षात आला आहे.

उलट काँग्रेससह सर्व विरोधक जुन्या पेगासस कृषी विधेयक आणि खासदार शंतनू यांचे निलंबन या विषयावर अडून बसले आहेत. मीडियातला सेक्शन वगळता विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर सोशल मीडियात कोणी चर्चा करताना दिसत नाही. सोशल मीडियावर सध्या विरोधकांनी मांडलेले विषय “डाऊन ट्रेंड” दिसत आहेत.

विरोधक संसद चालू देत नाहीत. संसदेच्या सभागृहात आणि बाहेरही हंगामा करतात. या विषयावर दोन दिवसांपूर्वी टीकाटिप्पणी होत होती. सोशल मीडियावर त्याची दखल घेतली जात होती. पण आता या मुद्द्यांची सोशल मीडियात प्लॅटफॉर्मवर दखलही घेतली जात नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Social Media Trends; Sindhu, after the victory in hockey, the mood of the country is “up beat” but the down trend … !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात