प्रसार माध्यमांत बातम्यांना जातीय रंग तर सोशल मिडीयात फेक न्यूजचे वर्चस्व – सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काही प्रसार माध्यमे बातम्यांना जातीय रंग देत असल्याने देशाची बदनामी होत असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले. तसेच, वेब पोर्टल आणि युट्यूबसह सोशल मीडियाद्वारे पसरत असलेल्या ‘फेक न्यूज’बाबतही न्यायालयाने चिंता व्यक्त केली. Social media spreads fake news says SC

अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास सरकारला सांगावे, अशी विनंती करणाऱ्या याचिकांच्या सुनावणीवेळी खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा म्हणाले, ट्विटर, फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर सामान्य लोकांच्या प्रश्नां ना उत्तरे मिळत असल्याचे आम्ही कधी ऐकले नाही. ते कधीही प्रतिक्रिया देत नाहीत, जबाबदारी घेतली जात नाही.



‘‘काही प्रसार माध्यमे या देशात घडणारी प्रत्येक गोष्ट जातीय दृष्टीकोनातून दाखवतात, ही एक मोठी समस्या आहे. यामुळे अखेर देशाचेच नाव खराब होते. सरकारने कधी या खासगी वाहिन्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे का? सोशल मीडियावर केवळ प्रभावी असलेले आवाजच ऐकले जातात. जबाबदारीचे भान न राखताच न्यायाधीश, विविध यंत्रणा आणि इतर अनेक गोष्टींबाबत बोलले जाते,’’ असे खंडपीठ म्हणाले.

Social media spreads fake news says SC

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात