एका हाताने द्यावे अन् दुसऱ्या हाताने घ्यावे किंवा पेरल्याशिवाय उगवत नाही या ग्रामीण भारतातील म्हणी. त्याचा प्रत्यय सध्या कोरोना महामारीत येत आहे. भारताने गेल्या वर्षभरात जगातील अनेक देशांना केलेल्या मदतीमुळे संकटाच्या काळात आपल्याकडे मदतीचा ओघ सुरू झाला आहे.So the flow of help started towards India, followed by the mantra of “Give with one hand”
विशेष प्रतिनिधी
मुंबई : एका हाताने द्यावे अन् दुसºया हाताने घ्यावे किंवा पेरल्याशिवाय उगवत नाही या ग्रामीण भारतातील म्हणी. त्याचा प्रत्यय सध्या कोरोना महामारीत येत आहे.
भारताने गेल्या वर्षभरात जगातील अनेक देशांना केलेल्या मदतीमुळे संकटाच्या काळात आपल्याकडे मदतीचा ओघ सुरू झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगभरातील नेत्यांशी चांगले संबंध आणि भारताची वॅक्सिन डिप्लोमसी या संकटात महत्वाची ठरली.
भारताने व्हॅक्सीन मैत्रीचे धोरण स्वीकारून जगातील अनेक देशांना मदत केली. ही मदत आता संकटाच्या काळात उपयोग पडत आहे. देशात दररोज लाखो करोना रुग्णांची वाढ होत असल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.
देशभरातील रुग्णालयात बेड कमी पडू लागले, ऑक्सिजनचा तुटवडा झाला. ही परिस्थिती समोर येताच जगभरातील बलाढ्य देशांसह अगदी छोट्या छोट्या देशांनीही भारताला मदत देण्यासाठी पुढाकार घेतला.
जगातून येणाºया मदतीला भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मैत्री असं नाव दिलं आहे. समुद्र आणि हवाईमार्गे भारतात मदतीचा ओघ सुरू झाला. अमेरिकेपासून ते सिंगापूरपर्यंत प्रत्येक देशाने भारताला आपापल्या पद्धतीने मदत पाठवली.
अमेरिकेने भारताने त्यांच्या संकट काळात केलेली मदत न विसरता लसीसाठी आवश्यक असणारा कच्चा माल पाठवण्याचाही निर्णय घेतला. भारताचं जागतिक महत्त्व या संकट काळात अधोरेखित झाल्याचंही जाणकार सांगतात.
भारताचेभारताने लस बाजारात आणताच जगातील ९५ देशांना लसीचे साडे सहा कोटी डोस पुरवले. यामुळे आफ्रिका खंडातील छोट्या छोट्या देशांपर्यंत भारताला पोहोचता आलं. भारताने लस निर्यात सुरू केली तेव्हा पुढे भारतात एवढं संकट निर्माण होईल याची कुणालाही कल्पना नव्हती.
पण भारताने मैत्री कायम राखत अनेक गरीब देशांना मदत केली. पण भारतावर संकट आल्यावर आखाती देशांसह अमेरिका, आॅस्ट्रेलिया, ब्रिटन, सिंगापूर, रशिया अशा कित्येक देशांनी भारताची मदत केली. फ्रान्सने तर भारताला आपल्या प्राधान्यक्रमावर ठेवलं आणि खांद्याला खांदा लावून सोबत राहू असंही जाहीर केलं.
भारताला जगाचे औषधालय मानले जाते. आफ्रिकेतील एचआव्ही निर्मूलनात भारताची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. याशिवाय जगभरातील अत्यावश्यक औषध पुरवठ्यात भारत कायम आघाडीवर राहिलेला आहे.
यामुळे भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडून पडणं हे कोणत्याच देशासाठी परवडणारं नव्हतं. भारत या संकटातून न सावरल्यास भारताएवढाच फटका अनेक देशांना बसणंही स्वाभाविक आहे. कारण, जगाला मोठ्या प्रमाणात लसीची अपेक्षा फक्त भारताकडूनच आहे.
फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या देशांसोबतचे भारताचे संबंध गेल्या काही काळात अत्यंत चांगले राहिले आहेत. त्यामुळे फ्रान्सने भारताचं विशेष महत्त्व अधोरेखित करत मदत पाठवली.
ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेनेही क्वाडची एकी दाखवली आणि मदत पाठवली. क्वाडमुळे चीनचा तिळपापड झालेला आहे. त्यामुळे भारतासारख्या अत्यंत महत्त्वाच्या देशाला कमकुवत होऊ देणं अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाला परवडणारं नाही.
यामुळेच अमेरिकेनेही या संकट काळात भारताला काहीही कमी पडू देणार नसल्याचं सांगितलं.भारतात मदतीचा ओघ २७ एप्रिलपासून सुरू झाला होता.
भारताला विविध देशांकडून नऊ हजारांवर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, साडेचार हजारांवर ऑक्सिजन सिलेंडर्स, २०ऑक्सिजन निर्मिती प्लांट्स, सहा हजार व्हेंटिलेटर्स आणि सात लाखांपेक्षा अधिक रेमडेसिविर मिळाले आहेत. केंद्राकडून विविध राज्यांना ही मदत वितरित केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App