अमिताभ बच्चन म्हणाले, आकडे महत्वाचे नाहीत पण कोरोना महामारीत केली १५ कोटी रुपयांची मदत


आकडे महत्वाचे नसले तरी कोरोनाच्या महामारीत आपण आत्तापर्यंत १५ कोटी रुपयांची मदत केली असल्याचे प्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. प्रत्येक भारतीयाने या संकटप्रसंगी एकतेने ठेऊन देशाच्या पाठीशी मजबूतपणे उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.Amitabh Bachchan said that the numbers are not important but in the Corona epidemic helped Rs 15 crore


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आकडे महत्वाचे नसले तरी कोरोनाच्या महामारीत आपण आत्तापर्यंत १५ कोटी रुपयांची मदत केली असल्याचे प्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

प्रत्येक भारतीयाने या संकटप्रसंगी एकतेने ठेऊन देशाच्या पाठीशी मजबूतपणे उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये कोरोना महामारीमध्ये त्यांनी लोकांना कशा पध्दतीने मदत केली सविस्तर लिहिले आहे.



अमिताभ बच्चन यांनी दिल्लीतील रकाब गंज गुरुद्वारामध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी 300 खाटांची सोय केलीआहे. यासाठी त्यांनी दोन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या कोव्हिड सेंटरचे नाव श्री गुरू तेग बहादुर कोव्हिड केंद्र फॅसिलिटी असे असणार आहे.

यात कोरोनाबाधित रुग्णांसाठी डॉक्टर, पॅरामेडिक्स, रुग्णवाहिका,ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचीही सोय असणार आहे. हे कोव्हिड केंद्र रुग्णांसाठी खुले होणार आहे. तसेच या केंद्रामध्ये कोरोनाबाधितांवरील उपचार पूर्णपणे मोफत होणार आहेत.

अमिताभ यांनी लिहिले आहे की, त्यांनी दिल्लीत असलेल्या कोरोना फॅसिलीटीसाठी २ कोटींचे योगदान केले आहे. माझ्या वैयक्तिक फंडाद्वारे सुमारे १५०० शेतकºयांच्या बँकेतील कर्जाची भरपाई केली आणि त्यांना आत्महत्या करण्यापासून थांबवले.

गेल्या वर्षी, त्यांनी एक महिन्यासाठी संपूर्ण देशात ४ लाख कामगारांना जेवण दिले. एका शहरातील सुमारे ५ हजार लोकांना त्यांनी दुपारचे आणि रात्रीचे जेवण दिले. मास्क, फ्रंटलाइन वर्कर्सला पीपीई किट दिल्या, पोलिसांच्या रुग्णालयात हजारोंमध्ये पर्सनल फंड्स दिले.

स्थलांतरीत मजुरांना केलेल्या मदतीबाबत अमिताभ यांनी लिहिले आहे की, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील कामगारांना परतण्यासाठी ३० बस बूक केल्या आणि त्यांच्या रात्रीच्या प्रवासासाठी जेवणाचा आणि पाण्याचा पुरवठा केला.

या सोबत ज्यांच्याकडे चप्पल नव्हत्या त्यांना चप्पल देखील दिल्या. मुंबई ते उत्तरप्रदेश अशी एक संपूर्ण ट्रेन बूक केली, ज्या ट्रेनमध्ये २८०० प्रवासी मोफत गेले. त्यासाठी मी पैसे दिले होते.

जेव्हा त्या राज्यांनी त्या लोकांना राज्यात येण्यावर बंदी केली, तेव्हा तातडीने ३ चार्टड इंडिगो एअरलाईन विमानाने प्रत्येकी १८० प्रवास्यांना उत्तर प्रेदश, बिहार, राजस्थान आणि जम्मू-काश्मिरला पोहोचवले

Amitabh Bachchan said that the numbers are not important but in the Corona epidemic helped Rs 15 crore

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात