स्मृती इराणींच्या मुलीवर बार चालवण्याचा आरोप; 24 तासांत ट्विट डिलीट करा, काँग्रेस नेत्यांना हायकोर्टाने फटकारले


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि त्यांच्या मुलीवर काँग्रेस नेत्यांनी नुकतेच गंभीर आरोप केले आहेत. पण याचबाबत आता दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेत्यांना दणका दिला आहे. इराणी आणि त्यांच्या मुलीवर आरोप करण्यात आलेले ट्विट डिलीट करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने काँग्रेस नेत्यांना दिले आहेत. Smriti Irani’s daughter accused of running a bar; Delete tweets within 24 hours

न्यायालयाचे आदेश

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीच्या मालकीचे गोव्यात एक रेस्टॉरंट असून त्यात अवैधरित्या मद्यालय चालवणात येत असल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम नरेश, पवन खेरा आणि नेट्टा डिसूजा यांनी ट्वीट करत केला होता. याविरोधात स्मृती इराणी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. शुक्रवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेत्यांना फटकारले आहे.


SMRITI IRANI : महिला सशक्तिकरण-‘लड़की हूं, लड़ सकती हूं’च्या बाता मारणार्या कॉंग्रेसने ‘त्या’ आमदाराला निलंबित करावे:स्मृती इराणी


आरोप केलेले संबंधित ट्वीट 24 तासात डिलीट करण्यास सांगत, 18 ऑगस्ट रोजी या खटल्याच्या सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने जयराम नरेश, पवन खेरा आणि नेट्टा डिसूजा यांना दिले आहेत.

काँग्रेसचे आरोप

स्मृती इराणी यांची कन्या जोईश इराणी त्यांचं गोव्यात सिली सोल्स कॅफे अँड बार नावे एक रेस्टॉरंट असून त्याव बेकायदेशीररित्या मद्यालय सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. त्यामुळे इराणी यांची तात्काळ केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही काँग्रेस नेत्यांनी केली आहे.

पण हे आरोप निराधार असून आपली आणि आपल्या मुलीची बदनामी करण्यासाठी हे आरोप करण्यात येत असल्याचे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे. त्यामुळे यासंदर्भात माफी मागण्यासाठी इराणी यांनी संबंधित काँग्रेस नेत्यांना नोटीस बजावली आहे.

Smriti Irani’s daughter accused of running a bar; Delete tweets within 24 hours

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात