राष्ट्रपत्नी अश्लाघ्य टिपण्णी : काँग्रेस नेत्यांचे नेमके राजकीय – सामाजिक दुखणे काय??


विनायक ढेरे

काँग्रेसचे लोकसभेतले गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संदर्भात “राष्ट्रपत्नी” अशी अश्लाघ्य टिपण्णी केली. त्यावरून संसदेसह देशात प्रचंड गदारोळ माजला. हा गदारोळ इतका टोकाला पोहोचला की थेट केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यात अक्षरशः तू तू मैं मैं झाले. सोनिया गांधी भाजपच्या खासदार रमादेवी यांच्याशी लोकसभेत बोलत असताना स्मृती इराणी “मे आय हेल्प यू?”, असे विचारत तिथे पोहोचल्या. तेव्हा “यु डोन्ट टॉक टू मी” असे प्रत्युत्तर ते सोनिया गांधींनी त्यांना उडवून लावण्याचा प्रयत्न केला. “राष्ट्रपत्नी” या टिप्पणीवरून आधीच संतप्त झालेल्या भाजपच्या खासदारांच्या संतापात सोनिया गांधी स्मृती इराणी यांच्या वादामुळे आणखीनच भर पडली. काल दिवसभर हाच वाद राजकीय वर्तुळात रंगला होता. Rashtrapatni derogatory remarks by Congress leader Bashir ranjan chaudhary showed Congress ill political and social mentality

– अधीर रंजन चौधरींची टिपण्णी

पण मूळात अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संदर्भात “राष्ट्रपत्नी” असे म्हणून जी अश्लाघ्य टिपण्णी केली त्यामागचे राजकीय कारण काय आहे?? कारण या टिपण्णीनंतर अधीर रंजन चौधरी आणि काँग्रेसच्या मानसिकतेवर जी टीका झाली त्यामध्ये काँग्रेसची पुरुषी मानसिकता इथपासून ते काँग्रेसचा भाजप द्वेष, काँग्रेसचा आदिवासी द्वेष इथपर्यंत अनेक आरोप करण्यात आले. पण काँग्रेसजनांचे वास्तविक राजकीय आणि सामाजिक दुखणे त्या पलिकडचे आहे.

Raj – Aditya : चुलत काकाला काटशह जरूर; पण त्या पलिकडे आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा नेमका अर्थ काय…??

– द्रौपदी मुर्मूंच्या निवडी मागचे इंगित

भाजपने जशी द्रौपदी मुर्मू यांना आदिवासी महिला म्हणून राष्ट्रपती पदाची संधी दिली तशी संधी काँग्रेसने अनेक नेत्यांना आतापर्यंत विविध पदांवर दिली आहे. पण यात राष्ट्रपती पद अथवा पंतप्रधान पदासारखे सर्वोच्च पद कधीही नव्हते. अपवाद फक्त के. आर. नारायणन यांचा. अर्थात नारायण आणि द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीमध्ये मूलभूत फरक आहे. नारायणन हे नेहरूंच्या काळापासून परराष्ट्र प्रशासकीय सेवेतले मोठे अधिकारी होते. अनेक देशांचे राजदूत आणि नंतर उपराष्ट्रपती राहिले होते. द्रौपदी मुर्मू या मात्र सर्वसामान्य शिक्षिका नंतर काही काळ ओरिसात राज्यमंत्री, झारखंडच्या राज्यपाल होत्या. आणि आता त्या थेट राष्ट्रपती झाल्या आहेत. नारायण आणि द्रौपदी मुर्मू यांची राजकीय आणि सामाजिक पृष्ठभूमी पूर्णतः भिन्न आहे. (याबाबत इंदिरा गांधींच्या काळातले माजी केंद्रीय मंत्री बाबू जगजीवन राम यांची टिपण्णी बरेच मोठे राजकीय भाष्य करून जाणारी होती. “इस मूल्क मे चमार कभी प्राईम मिनिस्टर नही बन सकता”, असे ते म्हणाले होते.)

भाजपने राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांना निवडून आणणे या मागचे खरे राजकीय इंगित काँग्रेसजनांना न रुचणारे आणि न झेपणारे आहे. आत्तापर्यंत काँग्रेसजनांनी राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या जो विचारच केला नव्हता, तसा विचार द्रौपदी मुर्मू यांच्या निवडी मागे आहे. जो समाज पूर्णपणे राजकीय परिक्षेत्राच्या बाहेर ठेवण्यामध्ये काँग्रेसजनांनी वेगळ्या प्रकारची धन्यता मानली होती, त्या समाजातल्या व्यक्तीला सर्वोच्च पदावर बसण्याची संधी भाजपने दिली आहे.

– काँग्रेसच्या परिक्षेत्राबाहेरची राजकीय खेळी

एक प्रकारे काँग्रेसच्या सामाजिक आणि राजकीय परिक्षेत्राबाहेरची ही राजकीय खेळी आहे आणि नेमके हेच काँग्रेसजनांचे राजकीय आणि सामाजिक दुखणे आहे!! जे आपल्याला जमले नाही किंवा जे आपण करू शकलो नाही, ते भाजपचे सध्याचे नेतृत्व सहजसाध्य करते आहे आणि त्यामुळे आपल्या पक्षाचा राजकीय आणि सामाजिक आधार बळकट करताना ते परस्पर काँग्रेसचा राजकीय आणि सामाजिक आधार कमकुवत आणि भुसभुशीत करत आहेत याची पक्की जाणीव आता काँग्रेस नेतृत्वाला झाली आहे. परंतु सहन होत नाही आणि सांगता येत नाही, अशी काँग्रेस नेतृत्वाची त्यातून अवस्था झाली आहे आणि यामुळेच अधीर रंजन चौधरी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या तोंडून “राष्ट्रपत्नी” अशा सारखी अश्लाघ्य टिप्पणी बाहेर पडली आहे.

– राजकीय चातुर्याचा अभाव

या मुद्द्यावरून माफी मागून प्रकरणावर पाडण्याच्या ऐवजी काँग्रेस हायकमांडसह सगळेच नेते भाजपच्या नेत्यांच्या हातात आयते राजकीय कोलीत देत आहेत 1990 च्या दशकापर्यंत काँग्रेस नेत्यांमध्ये जे राजकीय चातुर्य आणि आणि सामाजिक शहाणपण होते त्याचा मागमूसही सध्याच्या काँग्रेस नेतृत्वामध्ये दिसत नाही हे या प्रकरणामुळे अधिक ठळकपणे समोर आले आहे.

Rashtrapatni derogatory remarks by Congress leader Bashir ranjan chaudhary showed Congress ill political and social mentality

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात