स्वतःच्या बापाच्या नावावर मते मागा!!; बंडखोरांवर कारवाईचे उद्धव ठाकरेंना सर्वाधिकार


प्रतिनिधी

मुंबई : स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा. आधी नाथ होते, आता दास झाले असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बंडखोरांना आधी त्यांचा निर्णय घेऊ द्या. माझ्यावर शिवसैनिकांचे जास्त प्रेम असल्याचे ठाकरे म्हणाले. शिवसेनेच्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक शिवसेना भवनात झाली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गटावर जोरदार निशाणा साधला. या बैठकीत संजय राऊत यांनी ठराव मांडले. Shivsena working committee authorized Uddhav Thackeray to punish rebellion group of eknath shinde



एकनाथ शिंदे, रामदास कदमांवर कारवाई नाही

शिवसैनिकांना शिवसेना भवनावर जमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोठे शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत शिवसेना असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वाची बैठक शिवसेना भवन याठिकाणी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यकारिणीत महत्वाचे पाच ठराव देखील मांडण्यात आले आहेत. यामध्ये पुन्हा हिंदुत्वाचा झेंडा फडकवायचा, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना रामदास कदम यांना शिवसेना नेतेपदावरून हटवण्यात आलेले नाही.

 कोणते ठराव मंजूर?

  •  पक्षप्रमुखांना निर्णय घेण्याचे सर्वाधिकार
  •  शिवसेनेशी बेईमानी करण्यावर कठोर कारवाई करण्याचे सर्वाधिकार ही राष्ट्रीय कार्यकरणी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना देत आहे
  •  या ठरावामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडून आता बंडखोरांवर कारवाई करण्यात येणार आहे.
  •  शिवसेनेने आपल्या ठरावात पुन्हा एकदा मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नसल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
  •  बाळासाहेब ठाकरे यांचे नाव फक्त शिवसेनेलाच वापरण्याचा अधिकार असेल, कुणी बंडखोर या नावाचा वापर करू शकत नाही.

Shivsena working committee authorized Uddhav Thackeray to punish rebellion group of eknath shinde

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात