विशेष प्रतिनिधी
दिल्ली : लखीमपूर खेरी मधील हिंसाचारानंतर प्रियांका गांधी जेव्हा पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात होत्या, त्यावेळी त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडित कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी दिली नव्हती. त्यानंतर प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज दिले होते की, लखीमपुरा खैरी मधील हिंसाचाराला बळी पडलेल्या कुटुंबियांची पंतप्रधान मोदी यांनी भेट घ्यावी. पंतप्रधान या मुद्द्यांवर अजूनही का बोलत नाहीयेत? असा परखड प्रश्नही त्यांनी विचारला होता.
Shiv Sena praises Priyanka Gandhi for challenging PM Narendra Modi
शिवसेनेने आपल्या सामना या वृत्तपत्रातून प्रियांका गांधी यांच्या या वक्तव्याचे कौतुक केले आहे. आणि त्यांची तुलना पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्यासोबत केली आहे. सामना या वृत्तपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लखिमपुर खैरी हिंसाचारावर मौन बाळगल्याबद्दल टीका देखील करण्यात आली आहे.
Priyanka Gandhi Arrested : प्रियांका गांधींना अटक, शांतता भंग आणि कलम -144 चे उल्लंघन केल्याचा आरोप
सामन्यामध्ये असेही लिहिले आहे की, पूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतासाठी खूप मोठे बलिदान दिले आहे. भारत पाकिस्तानच्या फाळणीमध्ये इंदिरा गांधी यांचा महत्त्वाचा रोल होता. असे तडफदार व्यक्तिमत्त्व असणाऱ्या व्यक्तीची नात प्रियांका गांधी आहे. ज्या सध्या काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी म्हणून काम करतात. त्यांना लखीमपुरा खैरी येथील हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित लोकांना भेटण्यापासून मज्जाव करणे हे चुकीचेच आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App