अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आईची जमीन खरेदीत दीड कोटीची फसवणूक

विशेष प्रतिनिधी

मुंबई – पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्रामुळे सध्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी चर्चेत असताना तिची आई सुनंदा शेट्टी यांची दीड कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी त्यांनी जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.Shilpa shetties mother cheated in land case

तक्रारीनुसार, मे २०१९ ते फेब्रुवारी २०२० या काळात रायगडच्या कर्जत परिसरात चार हेक्टर जमिनीबाबत सुधाकर घारे नामक व्यक्तीशी सुनंदा यांचा व्यवहार झाला होता. त्यासाठी त्यांनी सुधाकरला १ कोटी ६० लाख रुपयेदेखील दिले होते;मात्र काही काळानंतर जमिनीची कागदपत्रे बोगस असल्याचे सुनंदा शेट्टी यांच्या लक्षात आले. नंतर सुधाकरने पैसे परत करण्यासही नकार दिला व खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्याची धमकी दिली, अशी तक्रार सुनंदा यांनी दिली आहे.

याप्रकरणी अंधेरी न्यायालयात अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाने पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जमीन व्यवहार प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार सुनंदा शेट्टी यांनी केली आहे.

Shilpa shetties mother cheated in land case

महत्त्वाच्या बातम्या