वृत्तसंस्था
मुंबई : कोरोना काळात अन्य क्षेत्रांना संकटाचे दिवस आले आहे. मात्र, सोने आणि शेअर बाजाराला सुगीचे दिवस आले आहेत. सोन्याने देखील सर्वकालिन टप्पा गाठला तर गेल्या वर्षीच शेअर बाजाराने देखील ५० हजारांचा टप्पा गाठला होता. आज तर शेअर बाजाराने कमालच केली. निर्देशांकाने (Sensex) पहिल्यांदाच ६० हजारांचा टप्पा पार करून इतिहास रचला आहे. Share Markets on a new high – Sensex crosses 60,000-mark for first time, Nifty Above 17,900
कोरोना काळात शेअर बाजारात आज सकाळी ३८८ अंकांची उसळी घेऊन बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या सेन्सेक्सने ६०,००० चा टप्पा ओलांडला आहे. एवढा मोठा पल्ला गाठण्याची शेअर बाजाराची ही पहिलीच वेळ आहे.
सध्या शेअरबाजार २८८ अंकांनी वधारून ६०,१७३ वर ट्रेड करत आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीदेखील १०० अंकांनी उसळला असून रेकॉर्ड स्तरावर म्हणजेच १७.९२३.३५ वर ट्रेड करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App