शरद पवारांनी स्वतःचे उदाहरण देऊन सांगितले मल्लिकार्जुन खर्गेंच्या संभाव्य विजयाचे इंगित


प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काल 17 ऑक्टोबर रोजी रोजी मतदान झाले. मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत विजयी कोण होणार?, या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे.Sharad Pawar cited his own example as an indication of Mallikarjun Kharge’s possible victory

मल्लिकार्जुन खरे यांचे नाव पुढे दिसत आहे. ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबरोबर मी संसदेत अनेक वर्ष एकत्र काम केले आहे. काँग्रेस संघटनेच्या दृष्टीने त्यांचे नेतृत्व चांगले परिणामकारक ठरेल, असे शरद पवार म्हणाले आहेत.



पण त्याचवेळी शरद पवारांनी स्वतःचे उदाहरण देऊन मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विषयाचे पारडे कसे जड राहील??, हे देखील स्पष्ट केले आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक मी देखील लढवली होती. त्यावेळी बिहार मधले काँग्रेसचे वरिष्ठ नेते सीताराम केसरी ही निवडणूक जिंकले होते.

मी पराभूत झालो होतो. त्यावेळेस सीताराम केसरी यांना गांधी परिवाराचा पाठिंबा होता, अशी आठवण शरद पवारांनी सांगितली आहे. याचा अर्थ काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गांधी परिवाराचा मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठिंबा आहे. त्यामुळे ते विजय होतील, असे म्हणत शरद पवारांनी त्यांना गांधी घराण्याचा पाठिंबा असल्याचे आपल्या वक्तव्यातून सूचित केले आहे.

Sharad Pawar cited his own example as an indication of Mallikarjun Kharge’s possible victory

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात