धर्माच्या मार्गावर जाण्यासाठी रोडीज फेम सकीब खाननेही सोडली रुपेरी दुनिया.. म्हणाला, अल्लाने माझ्यासाठी दुसरी योजना आखलीय!

धर्माच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी अभिनेत्री सना खानपाठोपाठ आता रोडीज फेम मॉडेल- अभिनेता सकीब खान यानेही रुपेरी दुनिया सोडण्याचा निर्णय घषतला आहे. मनोरंजनाची दुनिया सोडून आपण अध्यात्माचा रस्ता धरत आहोत असे सकीबने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे. अल्लाने आपल्यासाठी दुसरी योजना आखल्याचेही त्याने म्हटले आहे.Shakib Khan also left Showbizz to follow the path of Dharma, said Allah has another plan for me


विशेष प्रतिनिधी

मुंबई : धर्माच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी अभिनेत्री सना खानपाठोपाठ आता रोडीज फेम मॉडेल- अभिनेता सकीब खान यानेही रुपेरी दुनिया सोडण्याचा निर्णय घषतला आहे.

मनोरंजनाची दुनिया सोडून आपण अध्यात्माचा रस्ता धरत आहोत असे सकीबने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे. अल्लाने आपल्यासाठी दुसरी योजना आखल्याचेही त्याने म्हटले आहे. 

रोडीजचा स्पर्धक म्हणून सकीब खान याने रुपेरी दुनियेत प्रवेश केला होता. काश्मीरमधील या मॉडेलने अल्पावधीतच लोकांची पसंती मिळविली होती. रोडीज शो मध्ये त्याची सुरूवातच धमाकेदार झाली होती.

मी काश्मीरी आहे परंतु दगडफेक करणारा नाही, हे त्याचे वक्तव्य गाजले होते. रोडीजचा सूत्रसंचालक रणविजय सिंगही त्यावर चांगलाच प्रभावित झाला होता.

मात्र, आता सकीबने रुपेरी दुनियेत राहायचे नाही असा निर्णय घेतला आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की भविष्यात तो मॉडेलींग किंवा अभिनय करणार नाही. आपल्यासाठी अनेक चांगले प्रोजेक्ट होते.

माझ्याकडे भरपूर कामही होते. परंतु, अल्लाची इच्छा नव्हती. माझ्यासाठी अल्लाने त्यापेक्षाही काहीतरी चांगले करण्याचा विचार केला असेल. त्यामुळे मी हे काम सोडत असल्याचे त्याने म्हटले आहे.

मुंबईमध्ये अगदी कमी कालावधीमध्ये आपल्याला यश, पैैसे, किर्ती, सन्मान सर्व काही मिळाले. पण हे सगळे आतासाठी आहे. अखेरच्या दुनियेसाठी त्यातील कशाचाच उपयोग नाही.

Shakib Khan also left Showbizz to follow the path of Dharma, said Allah has another plan for me

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*