LGBTQ कम्युनिटीसाठी मॅचमेकिंग सर्व्हिस शादी.कॉम सुरू करणार

विशेष प्रतिनिधी

दिल्ली : लग्न लग्न असतं. ते अरेंजा असो किंवा लव्ह मॅरेज असतो. स्त्री आणि पुरुषाने एकमेका सोबत केलेलं असो किंवा एका पुरुषाने दुसऱ्या पुरुषासोबत केलेले असो. शादी डॉट कॉम हे जगातील सर्वात मोठे अरेंज मॅरेज जुळवण्याचे प्लॅटफॉर्म आहे.

Shaadi.com will launch a matchmaking service for the LGBTQ community

नुकताच या कंपनीने दोन नवे प्रोडक्ट लॉन्च केले आहेत. एक म्हणजे एलजीबीटीक्यू कम्युनिटीसाठी आणि जे लोक परदेशात राहतात, यांच्यासाठी हे दोन नवे प्रोडक्ट्स आहेत.

नुकताच हैदराबादमध्ये तेलंगानामधील पहिले गे लग्न पार पडले. अभय आणि सुप्रियो या दोघांनी आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याचे कस्मे वादे वगैरे या लग्नसोहळ्यांमध्ये घेतले होते. तर आता याच पाश्र्वभूमीवर कंपनीचे फाउंडर आणि एक्झिक्युटिव्ह अनुप मित्तल यांनी बिझनेस इनसायडरला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये आपल्या या दोन नवीन प्रॉडक्टची माहिती दिली आहे.


गे मॅरेज : हैदराबाद मध्ये पार पडले तेलंगणामधील पाहिले गे मॅरेज


ते म्हणतात की, आम्ही असे एक प्लॅटफॉर्म आहोत जिथे लग्न जुळवण्याचे काम होते. मग ते विविध भागांतील असोत, विविध देशांतील असोत, विविध लिंगांमधील लग्न असोत. लग्न जुळविणे हे आमचे प्रमुख धोरण आहे. आणि याचाच विचार करून आम्ही हे दोन नवीन प्रॉडक्ट लॉन्च करत आहोत. असे त्यांनी सांगितले आहे.

मागच्या वर्षी शादी डॉट कॉमने ‘वेडिंग फ्रॉम होम’ आणि व्हिडिओ कॉलिंग फीचर लॉन्च केले होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकमेकांशी चर्चा साधून लोकांना लग्न ठरवण्यासाठी अतिशय सोपा मार्ग उपलब्ध करून दिला होता. तर यावर्षी त्यांनी हे नवीन दोन फीचर्स लॉन्च केले आहेत.

Shaadi.com will launch a matchmaking service for the LGBTQ community

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात