धर्मसंसदेतील चिथावणीखोर भाषणांची दखल घ्यावी, देशातील सत्तर विधिज्ञांची सरन्यायाधीशंकडे विनंती


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली आणि हरिद्वारमधील धर्मसंसदेतील कथित चिथावणीखोर भाषणांची दखल घेण्यात यावी, अशी विनंती देशभरातील सत्तर विधीज्ञांनी सरन्यायाधीश एन.व्ही.रमण यांच्याकडे केली आहे.Seventy jurists in the country urge Chief Justice to take note of provocative speeches in Parliament

या कार्यक्रमांत करण्यात आलेली भाषणे ही केवळ द्वेषमूलकच नाहीत तर त्यात संपूर्ण समुदायाची हत्या करण्याची उघड चिथावणी देण्यात आली आहे. या भाषणांमुळे देशाचे ऐक्य आणि सर्वसमावेशकता याला धोकाच निर्माण झाला असून लाखो मुस्लिम नागरिकांच्या जीविताचा प्रश्न देखील निर्माण झालाअसल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. आताची ताजी चिथावणीखोर विधाने ही याआधी करण्यात आलेल्या विधानांच्याच शृंखलेतील असून अशा विधानांना पायबंद घालण्यासाठी तातडीने न्यायालयीन हस्तक्षेपाची गरज असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या पत्रावर स्वाक्षºया केलेल्यांमध्ये विधिज्ञ सलमान खुर्शिद, दुष्यंत दवे आणि मिनाक्षी अरोरा यांचा समावेश आहे.हरिद्वार येथील धर्मसंसदेमध्ये चिथावणीखोर वक्तव्ये केल्याप्रकरणी जितेंद्र नारायण त्यागी अन्य लोकांविरोधात उत्तराखंडमधील स्थानिक पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

अशाच प्रकारच्या कार्यक्रमाचे हिंदू युवा वाहिनीने दिल्लीत आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये देखील अल्पसंख्याक समुदायांविरोधात अशाच प्रकारची विधाने करण्यात आली होती. हरिद्वार येथील वादग्रस्त धर्मसंसदेचे आयोजन करणारे जुन्या आखाड्याचे यती नरसिंहानंदन गिरी हे पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

अल्पसंख्याक समुदाय आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याप्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी कालिचरण महाराज यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. राज्यात सत्ताधारी असलेल्या काँग्रेसचे नेते या विधानावरून संतापले असून त्यांनी भाजपला धारेवर धरले आहे. काँग्रेसचे स्थानिक नेते प्रमोद दुबे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.

Seventy jurists in the country urge Chief Justice to take note of provocative speeches in Parliament

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती