गरजू विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रमाद्वारे शिकविण्यासाठी होतकरू शिक्षक -विद्यार्थ्यांनी पुढे यावे; सेवा सहयोग फाउंडेशनचे आवाहन

प्रतिनिधी

मुंबई :  कोरोना महामारीमुळे मागील संपूर्ण शैक्षणिक वर्षात विद्यार्थी शाळेमध्ये जाऊ शकले नाहीत.  शिक्षकांचा प्रत्यक्ष संपर्क नसल्याने  व वैयक्तिक लक्ष देऊ न शकल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. असे विद्यार्थी पुढच्या इयत्तेत गेले पण त्यांचा आधीच्या इयत्तेचा पाया मात्र कच्चा राहिला. या विद्यार्थ्यांना शिकविण्याची तयारी असलेल्या होतकरूंनी पुढे येण्याचे आवाहन  सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.   Seva sahayog appeals to teaching class to come forward to teach through setu syllabus

विद्यार्थ्यांचे  शैक्षणिक नुकसान झाल्यामुळे बेरोजगारांची एक पिढी यातून तयार होण्याची दाट शक्यता आहे. हा धोका टाळण्यासाठी येत्या १ ऑगस्ट २०२१ पासून सेवा सहयोगच्या वतीने  ज्ञानसेतू हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.



यात आपल्या परिसरातील काही गरजू विद्यार्थी निवडून त्यांना आपल्या वेळेनुसार हा सेतू अभ्यासक्रम शिकविणारे स्वयंसेवकांची आवश्यकता असून  स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्यासाठी इच्छुकांनी  https://forms.gle/vqVUWxp76nPpuT5p8  या  लिंकवर अर्ज भरायचा आहे. अधिक माहितीसाठी (91674 48285) या क्रमांकावर संपर्क साधावा.

अनुभवी शिक्षक व शिक्षणतज्ञ यांच्या मदतीने सेवा सहयोगच्या वतीने  ३ री ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी गणित, विज्ञान व भाषा या विषयांसाठी एक सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. शैक्षणिक नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मागील इयत्तेमधील प्रमुख संकल्पनांची उजळणी करणारा हा एक लघु अभ्यासक्रम आहे. विद्यार्थी कसे निवडायचे, त्यांना काय व कसे शिकवायचे याचे मार्गदर्शन सेवा सहयोग मार्फत केले जाईल. शक्य असेल तिथे शिकवणीची जागा शोधण्यात  सेवा सहयोगच्या वतीने मदत केली जाणार आहे.

सेवा सहयोग फाउंडेशन ही एक नोंदणीकृत सामाजिक संस्था असून गेली बारा वर्षे अनेक शैक्षणिक सेवा प्रकल्प राबवीत आहे. संस्थेतर्फे मुंबई व पुणे विभागात १०० पेक्षा अधिक वस्त्यांमध्ये गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका चालविल्या जातात. गरजू आणि  गुणवंत विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचे दिली जाते. सेवा सहयोग तर्फे हजारो गरीब विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत शालेय संच वाटले जातात.

Seva sahayog appeals to teaching class to come forward to teach through setu syllabus

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात