भारतात सुई आणि सिरिंजची टंचाई निर्माण होण्याची शक्यता, सुई निर्मितीचा कारखाना बंद


विशेष प्रतिनिधी

फरिदाबाद – इंजेक्शनसाठी आवश्यrक असणारी सिरींज आणि सुई निर्माण करणारा एचएमडी कारखाना प्रदूषणाच्या कारणावरून बंद करण्यात आला आहे. फरिदाबाद आणि वल्लभगड येथे ११ एकरावर असलेल्या या कारखान्याला प्रदूषणाच्या कारणावरून टाळे ठोकण्यात आले आहे.Sering production stopped in Punjaub factory

कारखाना बंद केल्याने भारतात सुई आणि सिरिंजची टंचाई निर्माण होऊ शकते आणि लसीकरण मोहिमेला फटका बसू शकतो, अशी शक्यता वर्तविली आहे.दिल्ली आणि एनसीआर येथील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी राजधानी परिसरात उपाय केले जात आहेत.



प्रदूषणाच्या कारणावरून कारखाने बंद केले जात आहे. यानुसार फरिदाबाद येथे २२८ कंपन्या आणि कारखाने तात्पुरत्या बंद करण्यात आले आहेत. याचा फटका हिंदुस्थान सिरींज ॲड मेडिकल डिव्हायसेस लिमिटेड (एचएमडी) ला देखील बसला आहे.

एचएमडी कंपनीकडून सध्या देशभरातील लसीकरण मोहिमेला तब्बल ६६ टक्के सिरींज आणि सुईचा पुरवठा केला जात आहे. एचएमडी कारखान्यातून दररोज दीड कोटी सुई आणि सुमारे ८० लाख सिरिंजचे उत्पादन होते.

भारतात दररोज सुमारे १७५ ते २०० लाख सुईची गरज भासते. परंतु आता कारखाना बंद केल्याने उत्पादन शून्य झाले आहे. सिरींज उत्पादन करणारी एचएमडी ही जगातील सर्वात मोठी कंपनी ओळखली जाते.

Sering production stopped in Punjaub factory

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात