शब्बीर कुरेशी घरातच छापत होता नोटा; मुंबईमध्ये पायधुनीत बनावट नोटांचा कारखाना; पोलिसांकडून शब्बीरला अटक


प्रतिनिधी

मुंबई : बनावट भारतीय चलनी नोटांच्या कारखान्याचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला असून मुंबईतील पायधुनी परिसरात हा कारखाना सुरु होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाने ही महत्वाची कारवाई केली आहे. Mumbai Police busted an Indian banknote printing factory operating in Pydhonie area & arrested a 47-year-old man

राहत्या घरात छापायचा नोटा 

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा गुप्तवार्ता विभागाने पायधुनी परिसरात सुरू असलेला भारतीय नोटा छापण्याचा कारखान्याचा पर्दाफाश केला. या कारखान्यातून पोलिसांनी १ लाख ६० हजाराच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी गुप्तवार्ता विभागाने शब्बीर हासम कुरेशी या ४७ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. शब्बीरच्या घरातून पोलिसांनी एक संगणक प्रिंटर आणि बनावट नोटा बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य जप्त केले आहेत.

पायधुनीच्या करिमी मंजील, नारायण ध्रुत स्ट्रीट येथे आरोपी रहात असून राहत्या घरीच तो या नोटा छापत होता. मागील अनेक दिवसांपासून तो या नोटा छापत असून मुंबईच्या विविध बाजार पेठेत त्याने त्या वितरित केल्या आहेत. या प्रकरणी पायधुनी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून शब्बीरला अटक केली असून त्याचा साथीदार याचा शोध पोलिस घेत आहेत. शब्बीरवर यापूर्वीही एनडीपीएस अँक्ट अंतर्गत पायधुनी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे.

याआधी एनसीबीने पायधुनी येथे अमली पदार्थांची निर्मिती होत असलेला कारखानाच उद्धवस्थ केला होता. मुंबई पोलिस मुख्यालयापासून दीड-दोन किमी परिसरात हा कारखाना अनेक दिवस बिनदिक्कत सुरु होता, आता भारतीय बनावट चलनी नोटांचा कारखाना याच पायधुनी परिसरातून उद्ध्वस्त करण्यात आल्याने पोलिस मुख्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Mumbai Police busted an Indian banknote printing factory operating in Pydhonie area & arrested a 47-year-old man

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात