विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेला देशातील उद्योगांकडून बळ मिळत आहे. कित्येक वर्षांपासून विदेशातील कंपनी भारतीय लष्कर वापरत असलेल्या कलाश्निकोव्ह म्हणजे एके-47 रायफलीचे आधुनिकीकरणाचे काम देशातील कंपनीला मिळाले आहे.Self-reliant India, now the Indian company will modernize the AK47
सध्या अल्प प्रमाणात आधुनिकीकरण केले जाणार असले, तरी भविष्यात लहान शस्त्रांच्या बाजारपेठेत भारताचा दबदबा या माध्यमातून निर्माण होईल.आत्तापर्यंत विदेशी कंपन्या हेआधुनिकीकरणाचे काम करायच्या. मात्र, या कंपनीला बंगळुरूतील एका कंपनीने आव्हान दिले आहे.
इस्रायलच्या एफबी डिफेन्स कंपनीला मात देत बंगळुरूतील एसएसबी डिफेन्स कंपनीने एके रायफलीच्या आधुनिकीकरणाचा परवाना मिळवला आहे. लवकरच या कंपनीला कंत्राट दिले जाईल. सध्या या कंपनीला दक्षिण-पश्चिम कमांडमधील 24 एके रायफलींच्या आधुनिकीकरणाची जबाबदारी देण्यात आली.
योग्य प्रकारे आधुनिकीकरण झाल्यास मोठ्या प्रमाणात कंत्राट दिले जाईल. देशातील शस्त्र बाजारात कित्येक वर्षांपासून इस्रायलच्या एफबी डिफेन्स कंपनीचा दबदबा आहे. मात्र, दरवेळी ही कंपनी एकच उत्पादन सादर करते. वापरकर्त्यांची गरज आणि शस्त्राच्या मूल्याबाबत ही कंपनी विचार करीत नाही. ही बाब लक्षात ठेवून आम्ही कमी दरांत जास्त सुविधा दिल्या.
लष्कराने निर्धारित केलेल्या दजार्नुसार देशात एके 47 रायफली वापरल्या जातात. ही रायफल मजबूत धातू, लाकूड किंवा मिश्र धातूपासून तयार झाली असते. यात प्लॅस्टिकचा वापर केला जाऊ नये. एफबी डिफेन्स रायफलच्या बटसाठी प्लॅस्टिकचा वापर करते. यात विदेशातील सामानाचा वापर केला जातो.
त्यामुळे देशाचे नुकसान होते. त्यातच वाहतूक, अबकारी करांमुळे त्याची किंमत आणखी वाढते, अशी माहिती एसएसबी डिफेन्सच्या एका अधिकाºयाने दिली. आम्ही तयार केलेल्या एके रायफलीसाठी विमानासाठी वापरल्या जाणाºया मिश्रधातूचा वापर केला. त्यामुळे त्या वजनानी हलक्या पण मजबूत आहेत. आम्ही तयार केलेले शस्त्र पूर्णत: स्वदेशी आहे. यासाठी वापरलेले सुटे भाग देशातच तयार केले आहेत.
एके रायफलीचे आधुनिकीकरण करताना आम्ही यात फ्लॅश हायडर दिला आहे. एके रायफलीतून गोळी सुटते त्यावेळी नळीतून प्रखर प्रकाश बाहेर पडतो. रात्री हा प्रखर प्रकाश पाहून शत्रू त्या दिशेने गोळीबार करतात. यामुळे जवानांना धोका असतो. मात्र, आम्ही दिलेल्या फ्लॅश हायडर सुविधेमुळे हा धोका संपुष्टात आला आहे, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App