हम जितेंगे – Positivity Unlimited: आत्मविश्वास , सकारात्मकता हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली ; शंकराचार्य विजयेन्द्र सरस्वती आणि कलाकार सोनल मानसिंह यांचे मत


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजात सकारात्मकता वाढीस लागावी, या उद्देशाने ‘हम जितेंगे – Positivity Unlimited ‘ या ऑनलाइन व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य विजयेन्द्र सरस्वती आणि कलाकार सोनल मानसिंह यांनी गुंफले. Self Confidence and Positivity is the key to a successful life; Opinions of Shankaracharya Vijayendra Saraswati and artist Sonal Mansinh

दिल्ली येथील कोव्हिड रिस्पोन्स टीमच्या पुढाकाराने ही व्याख्यानमाला अक्षय्य तृतीये निमित्त 11 ते 15 मे पर्यंत सुरु राहणार आहे.



शंकराचार्य विजयेन्द्र सरस्वती म्हणाले..

1) संकटे कितीही आली तरी त्या संकटाना आत्मविश्वासाने तोंड द्या. संकटमोचन हनुमानाचा आदर्श समोर ठेऊन स्वतः मध्ये दृढ आत्मविश्वास निर्माण करा.

2) संकटातून मुक्त होण्यासाठी प्रार्थना, मंत्रोच्चार, देवाची स्तुती, हनुमान चालिसाचा पाठ करावा. सदाचार, नियम याचे पालन करावे.

3) आयुर्वेदिक आणि परदेशी उपचार करून घेऊन प्रथम या संकटातून मुक्त व्हा.

4) राम आणि रावणाच्या युद्धात रामदूत हनुमानाने महत्वाची भूमिका बजावली. हनुमानाने निराश झालेल्या सीतेच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. याच आत्मविश्वाची सध्या गरज आहे.

5) भगवान श्रीकृष्णाने गीतेत अर्जुनाला दिलेला उपदेश आजही उपयुक्त आहे. हृदयातील दुर्बलता सोड आणि धैर्याने उभा राहा, असे सांगितले होते. आज त्या धैर्याची तुम्हाला गरज आहे. प्रत्येकामध्ये धैर्य निर्माण झाले तर समाजात सामूहिक विश्वास निर्माण होईल.

6)सरकार, समाजातील संस्था एकजुटीने कार्य करत आहेत. त्याच्या सामूहिक परिणामामुळे कोरोना आता नियंत्रणात येत आहे.

7)वसुधैव कुटुंबकम या प्रमाणे जगाकडून ही मदत मिळत आहे.

8) देशभक्ती दाखविण्याची ही अनमोल संधी तुम्हाला मिळाली आहे. या संधीचे सोने करा.

9) विश्वप्रार्थनेत मोठे सामर्थ्य आहे. हे जग सुखी व्हावे, यासाठी केलेली प्रार्थना संकटावर मात करण्यासाठी उपयुक्त आहे.

10) भारताला मोठी सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. इतिहासात भारताने अनेक संकटांचा सामना केला आहे. त्यातून तावून सुलाखून तो निघाला आहे. या संकटावर सुद्धा मात करून भारत विजयी होईल.

कलाकार सोनल मानसिंह म्हणाल्या…

1) सर्व भारत कोरोनाची लढत आहे. हा अदृश्य शत्रू आहे. त्याचा मी सुद्धा शिकार झाले होते. केवळ कलेने मला वाचविले.

2) कोरोना बाधित झाले तेव्हा मला पूर्वीचा भयानक अपघात आठवला. या आजाराला मी एकटीने तोंड दिले. तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे तुमचे छंद, आवड, चित्रपटातील गीते, नाटकातील उतारे, काव्यपंक्तीत स्वतःला गुंतवून घ्या आणि आजारावर मात करा.

3) एकदा तर मी मारणार, असे वाटले होते. मी निराश, असहाय होते. निराशेच्या समुद्रातून मला कलेने आणि जिवंत राहण्याच्या उमेदीने तारले.

4) निराश , हताश होऊ नका. प्रत्येकाला मृत्यू आहे. त्यामुळे मृत्यूला घाबरू नका. भगवत गीतेतील वचने आठवा. शरीर नाशवंत असून आत्मा अमर आहे, याचा विचार करा.

5) मानसिकदृष्ट्या कितीही खचला तरी हार मानू नका. खंबीर व्हा. सकारात्मक व्हा.

6) आयुष्यात चढउतार असतात. त्यामुळे त्याला संसार म्हणतात. या संसाराचा गाडा हाकताना सकारात्मकता, प्रार्थना, मनावर नियंत्रण ठेवा. संयम ढळू देऊ नका.

7) नकारात्मक विचारांना जीवनातून हाकलून देण्यासाठी सकारात्मक विचारांचे बीज मनात रोपण करा. एक वेळ अशी येईल की, नकारात्मक विचार हे पुराचा लोंढा जसा येतो त्याप्रमाणे वाहून जातील. त्यासाठी जीवन सकारात्मक विचार, आशा, मांगल्य यांनी भरून टाका तरच तुम्ही विजयी व्हाल.

8) जीवन जगण्याची ही एक कला आहे. भवसागर पार करून जाण्यासाठी स्वतःतील कलेचा शोध घ्या. ती प्रत्येकात असते. फक्त ती तुम्हाला शोधून काढायची आहे.

9) कठीण संकटात तुम्हाला प्रार्थनेचा आधार घ्यावा लागेल. मनःशांतीसाठी ती मोलाची भूमिका बजावते. मन बलवान झाले तर जगात तुम्ही यशस्वी व्हाल.
10) संकटरुपी वादळात एक पणती प्रकाश दाखवते. वादळात तेवत राहते. अशा या संकटात तुम्हाला सकारात्मक विचारांची पणती तेवत ठेवली पाहिजे.

Self Confidence and Positivity is the key to a successful life; Opinions of Shankaracharya Vijayendra Saraswati and artist Sonal Mansinh

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात