प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे – पवार सरकारमधील काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर वादग्रस्त पोस्ट टाकत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केला. त्यानंतर मात्र त्यांना सोशल मीडियातून अत्यंत कडक शब्दांत विरोध होऊ लागताच नितीन राऊत यांनी लागलीच घाबरून ती पोस्ट काढून टाकली. परंतु भाजपा नेते, आमदार नितेश राणे यांनी त्या पोस्टचा स्क्रिनशॉट काढल्याने राऊत यांची विकृत मानसिकता जनसामान्यांसमोर आली आहे.Savarkar insulted by Nitin Raut; Delete posted as opposed
वीर सावरकर यांच्या या अवमानची भाजपाने गंभीरतेने दखल घेतली आहे. मात्र काँग्रेससोबत मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगणारी शिवसेना वारंवार वीर सावरकरांचा गौरव करताना दिसते, ती यावर काय भूमिका घेते, हे आता समस्त सावरकरप्रेमी पाहत आहेत. हिंदुस्थान पोस्टने ही बातमी दिली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत नितीन राऊत यांनी ही वादग्रस्त पोस्ट केली आहे. त्यांनी इंदिरा गांधींच्या काळातील दोन टपाल तिकीटे फेसबूकवर पोस्ट करत त्याला वीर सावरकर यांचा अवमान करणारे अत्यंत हिणकस शब्दांत कॅप्शन दिले. या पोस्टवरून भाजप आक्रमक झाली आहे
. नितीन राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त पोस्टवरुन भाजपा आमदार नितेश राणे यांनी त्यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. त्यावर आमदार नितेश राणे म्हणाले, ‘इंदिरा गांधींच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तिकीट छापले होते हे तर माहिती होते. पण इंदिराजींनी या लंगूराचे पण बालपणीच तिकीट काढले होते हे आजच समजले!’ सोशल मीडियातही नितीन राऊत हे जबरदस्त ट्रोल होत आहेत.
तिकिटांच्या किंमतीवर राष्ट्रभक्ताची किंमत ठरत नसते !!…तसे असेल तर मग 15-20 पैशाच्या नाण्यांवर, तिकिटावर गांधी-नेहरूंचे चित्र आहे, मग तुमच्या मते त्या माकडाची किंमत त्यांच्यापेक्षाही अधिक आहे ?@NitinRaut_INC उत्तर द्याल का ?@NiteshNRane@RanjitSavarkar@SunainaHoley https://t.co/gRjZl6Qn6Q pic.twitter.com/29GfnXNaFk — 🚩 Ramesh Shinde 🇮🇳 (@Ramesh_hjs) October 22, 2021
तिकिटांच्या किंमतीवर राष्ट्रभक्ताची किंमत ठरत नसते !!…तसे असेल तर मग 15-20 पैशाच्या नाण्यांवर, तिकिटावर गांधी-नेहरूंचे चित्र आहे, मग तुमच्या मते त्या माकडाची किंमत त्यांच्यापेक्षाही अधिक आहे ?@NitinRaut_INC उत्तर द्याल का ?@NiteshNRane@RanjitSavarkar@SunainaHoley https://t.co/gRjZl6Qn6Q pic.twitter.com/29GfnXNaFk
— 🚩 Ramesh Shinde 🇮🇳 (@Ramesh_hjs) October 22, 2021
“सध्या काँग्रेसमधील नेतेमंडळी वारंवार वीर सावरकर यांचा अवमान करून काँग्रेसला खड्ड्यात टाकण्याचे काम करत आहेत. त्यात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा यात मोठा सहभाग आहे. अशा मर्कट लीला करून ते काँग्रेस मुक्त भारत मोहिमेचे खंदे समर्थक बनले असल्याचे स्पष्ट होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काँग्रेस मुक्त भारत’ची हाक दिली. त्याच्या पूर्ततेसाठी काँग्रेसजनांमध्ये जणू चढाओढ लागली आहे. म्हणूनच काँग्रेसवाले वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करत आहेत.
काँग्रेस नेत्यांना ज्याप्रमाणे असे प्रकार करून काँग्रेसला खड्ड्यात घालायचे आहे, त्यादृष्टीने नितीन राऊत यांचेही प्रयत्न सुरु आहेत, काँग्रेस मुक्त भारत करण्यासाठी राऊत यांच्यासारखी काँग्रेसमधील मंडळी फारच मनावर घेऊन कामाला लागली आहेत, असेच यातून ध्वनित होत आहे.
ज्या व्यक्तीला स्वतःच्या खात्याचाही अभ्यास नाही, तो माणूस जेव्हा वीर सावरकर यांचा अवमान करणारे ट्विट सातत्याने टाकत असतो, त्यावेळी त्याला काँग्रेस पुन्हा निवडून येऊच नये, अशी इच्छा आहे, हेच त्यातून स्पष्ट होते. त्यासाठी त्यांना त्यांचा प्रयत्नाबद्दल शुभेच्छा आहे.
डॉ. सच्चिदानंद शेवडे, सावरकर साहित्याचे अभ्यासक, राष्ट्रीय प्रवचनकार
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा वारंवार अपमान करणाऱ्या नितीन राऊत यांचा निषेध. वीर सावरकर यांच्या स्मृती निमित्ताने तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी टपाल तिकीट काढले, मात्र आज त्यांच्याच पक्षाचे मंत्री हे त्यावर टिप्पणी करून आपल्या नेत्यांचा अपमान करत आहेत.
जर इंदिरा गांधी यांनी वीर सावरकर यांच्यापेक्षा माकडाच्या तिकिटाची किंमत अधिक ठेवली, असे मंत्री महोदयांना म्हणायचे असेल, तर काँग्रेसी संस्कृतीत आज देशभक्तांपेक्षा मर्कट उड्या मारणाऱ्यांना अधिक महत्त्व का आले आहे, हे त्यातून लक्षात येते, असे हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे म्हणाले.
खरे तर तिकिटांच्या किंमतीवर त्या राष्ट्रभक्ताची किंमत ठरत नसते; कारण तसे असेल तर मग 10-20 पैशाच्या भारतीय नाण्यांवर महात्मा गांधीजींचे चित्र आहे, मग त्या माकडाची किंमत गांधीजींपेक्षा अधिक मानली पाहिजे का? देशासाठी फार काही जमत नसेल,
तर किमान स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आपल्या क्रांतिकारकांचा आदर राखण्याएवढे सौजन्य काँग्रेसी नेत्यांमध्ये असले पाहिजे. ब्रिटिश सत्तेविरुद्ध ठाम राहून वीर सावरकर अंदमानात शिक्षा भोगण्यासाठी गेले, येथे या मंत्री महोदयांत तर स्वतःच्या ट्विट विषयी ही ठाम रहाण्याचे धाडस दिसले नाही, ट्विट डिलीट करून लगेचच पळ काढला, मग कोण पळपुटे निघाले?, असेही रमेश शिंदे म्हणाले
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App