विशेष प्रतिनिधी
अयोध्या : उत्तर प्रदेशातील राजकारणात पाया उखडत चालेल्या बहुजन समाज पक्षाने आता ब्राम्हण मते मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, यासाठी कुख्यात गॅँगस्टर विकास दुबे याचा पुळका बसपला आला आहे.Satish Chandra Mishra appeals for Brahmin votes, to avenge those who encounter Brahmins in Uttar Pradesh
उत्तर प्रदेशात ब्राह्मणांचे एन्काउंटर करणाºयांचा बदला घेण्याची वेळ आली आहे, असे बहुजन समाज पक्षाचे सरचिटणीस सतीशचंद्र मिश्रा यांनी केले आहे.उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका आहेत.
त्यामुळे ठिकठिकाणी ब्राह्मण संमेलन आयोजित करण्याचा आदेश बसपच्या प्रमुख मायावती यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना दिला. अयोध्या येथे पहिले ब्राह्मण संमेलन झाले. यावेळी मिश्रा बोलत होते.
सतीशचंद्र मिश्रा हे बसपमधील ब्राम्हण नेते आहेत. त्यांनीच काही वर्षांपूर्वी मायावती यांची ब्राम्हणविरोधी भूमिका बदलण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळेच तिलक, तराजू और तलवार, इनको मारो जुते चार असे म्हणणाºया मायावतींनी हाथी नहीं गणेश है, ब्रम्हा, विष्णू, महेश है अशी घोषणा दिली होती.
त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ब्राम्हण समाजाच्या मतपेटीवर डोळा ठेवला आहे. यामुळेच कुख्यात गॅँगस्टर विकास दुबे याच्या एन्काऊंटरचा मुद्दा बसपने हाती घेतला आहे. विकास दुबे ब्राम्हण होता.
तो पोलिसांबरोबरच्या एन्काउंटरमध्ये मारला गेला. विकास दुबेची नातेवाईक व बिकरू हत्याकांडातील आरोपी खुशी दुबे हिची सुटका होण्याकरिता बसपकडून प्रयत्न सुरू आहेत.
मिश्रा म्हणाले की, उत्तर प्रदेशात १३ टक्के ब्राह्मण व २३ टक्के दलित यांच्यात बंधुभाव निर्माण झाला तर राज्यात बसपचे सरकार येऊ शकते. ब्राह्मणांनी उपजातींचा त्याग करून त्यांच्यातील सर्वांना समान लेखले तर त्यांची शक्ती आणखी वाढेल.
भाजपने ब्राह्मणांच्या कल्याणासाठी काय केले, हा सवाल त्या पक्षाला विचारला पाहिजे. मायावती यांनी १५ ब्राह्मणांना मंत्री केले, ३५ जणांना विविध महामंडळाचे अध्यक्ष केले, १५ ब्राह्मणांना विधान परिषदेचे आमदार केले तर २२०० ब्राह्मण वकिलांना सरकारी वकील बनविले. ब्राह्मण अधिकाऱ्याला राज्याचा मुख्य सचिव केले.
अयोध्येमध्ये राममंदिराच्या नावाने गेल्या अनेक वर्षांपासून देणग्या गोळा केल्या जात आहेत. पण, या मंदिराचा पायाही अद्याप बांधून झालेला नाही. मायावती यांच्याकडे सत्ता येताच त्यांनी दीड वर्षात उत्तर प्रदेशमध्ये मोठमोठी स्मारके उभारली होती. पण, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एक वर्षात भाजपने राममंदिराचे काहीही काम केले नाही, असा आरोपही मिश्रा यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App