विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : गलवान खोऱ्यात चीनविरुद्धच्या संघर्षात धारातीर्थी पडलेले कर्नल संतोष बाबू यांच्या पुतळ्याचे त्यांच्या सूर्यापेट या गावात अनावरण करण्यात आले.हैदराबादपासून सुमारे १४० किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात राज्य मंत्री के. टी. रामाराव यांच्याहस्ते हा कार्यक्रम पार पडला.Santoh Babus statchu inaugurated
संतोष बाबू हे १६ बिहार रेजीमेंटचे कमांडिंग ऑफिसर होते. त्यांच्या कुटुंबीयांना तेलंगण सरकारने पाच कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले होते. याशिवाय पत्नीची राज्य शासनात अ दर्जाच्या अधिकारीपदी नियुक्ती व हैदराबादमध्ये निवासी भूखंड अशी मदतही करण्यात आली.
संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आले.गेल्या वर्षी गलवान खोऱ्यान चीनच्या सैन्याने घुसखोरी केली होती. त्यांच्या घुसखोरीला भारतीय जवानांनी खणखणीत प्रत्युत्तर देत त्यांना मागे जाण्यास भाग पाडले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App