मुजोर चीनला आर्थिक आघाडीवर उत्तर, 43 टक्के भारतीयांकडून वर्षभरात एकाही चिनी वस्तूची खरेदी नाही

India Vs China, Now On economic front 43% Indians did not buy any made in china goods in a year

गेल्या वर्षी लडाखजवळील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याच्या शूर जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. एवढेच नाही, तर त्यानंतर आतापर्यंत एका वर्षात लोकांनी आर्थिक आघाडीवर चीनला झटका देण्याचा प्रयत्नही केला आहे. एका सर्वेक्षणानुसार असे 43% भारतीय आहेत ज्यांनी गेल्या 12 महिन्यांत चीनमध्ये बनविलेले कोणतेही उत्पादन विकत घेतले नाही. India Vs China, Now On economic front 43% Indians did not buy any made in china goods in a year


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : गेल्या वर्षी लडाखजवळील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याच्या शूर जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. एवढेच नाही, तर त्यानंतर आतापर्यंत एका वर्षात लोकांनी आर्थिक आघाडीवर चीनला झटका देण्याचा प्रयत्नही केला आहे. एका सर्वेक्षणानुसार असे 43% भारतीय आहेत ज्यांनी गेल्या 12 महिन्यांत चीनमध्ये बनविलेले कोणतेही उत्पादन विकत घेतले नाही.

कम्युनिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लोकल सर्कल्सच्या सर्वेक्षणानुसार, चीनमध्ये बनविलेल्या वस्तू ज्यांनी विकत घेतल्या, ते म्हणाले की, आम्ही असे फक्त एकदाच केले आहे.

केंद्र सरकारून चीनच्या 100 हून अधिक अॅप्सवर बंदी व स्वदेशी वस्तूंच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्याच्या धोरणादरम्यान हे सर्वेक्षण आले आहे. गेल्या वर्षी चीनच्या सीमेवर रक्तरंजित संघर्षानंतर भारत सरकारने टिकटॉक, अली एक्स्प्रेससह अनेक अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. एवढेच नव्हे, तर गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाल्यानंतर देशभर संताप व्यक्त करण्यात आला होता.

अनेक वेळा चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लोकल सर्कल्सनेही असेच सर्वेक्षण केले होते, त्यानुसार 71 टक्के लोकांनी त्यावेळी चीनमध्ये बनविलेले कोणतेही सामान विकत घेतले नव्हते.

India Vs China, Now On economic front 43% Indians did not buy any made in china goods in a year

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात