संजय राऊत कारवाईच्या भीतीने सैरभैर झाल्याने शिवराळ शब्द वापरतात त्यांना आवरा, चंद्रकांत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आपण जे काही केले त्यामुळे आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावर कारवाई होईल अशी त्यांची स्थिती झाल्यामुळे राऊत हे सैरभैर झाले आहे. ते सातत्याने महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या लाजवणारे शिवराळ शब्द वापरतात. त्यामुळे मी उद्धव ठाकरे यांना विनंती करतो आहे की, संजय राऊत यांना आवरा असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.Sanjay Raut usesobusivewords for fear of repercussions, caution him, Chandrakant Patil’s appeal to the Chief Minister

शिवसेना नेते संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाजपवर जोरदार टीका करत आहे. टीका करताना राऊत हे शिवराळ भाषेचा वापर करत आहे, यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राऊतांवर निशाणा साधत म्हणाले, संजय राऊत यांना आवरा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.किरीट सोमय्यांनी सवाल केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत संतापले आहेत. त्यांनी माध्यमांसमोर बोलताना अपशब्दांचा वापर केला. ते म्हणाले की, ‘कोण आहे किरीट सोमय्या? देशात असे चु….लोक फार आहेत.

देशातील अशा प्रत्येक …… लोकांना शिवसेना, देशातील राजकारणाबाबत वारंवार प्रश्न विचारणे मीडियाला शोभत नाही. देशातील राजकारण 2024 नंतर अशा ….. लोकांना संपवून टाकेल. असे लोक देशामध्ये राहणार नाहीत. देशातील राजकारण पारदर्शक असणार आहे. 10 मार्चनंतर तुम्हाला कळेल.

Sanjay Raut usesobusivewords for fear of repercussions, caution him, Chandrakant Patil’s appeal to the Chief Minister

महत्त्वाच्या बातम्या