वृत्तसंस्था
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची मुदत 31 डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यांनी मुदतवाढ मागितलेली नाही, अशी माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दिली आहे.Sameer Wankhede’s term ends on December 31; Did not ask for an extension; Information from the Bureau of Narcotics Control
समीर वानखेडे यांच्या कारकिर्दीचा आढावा देखील ब्युरोने घेतला आहे. समीर वानखेडे यांनी ऑगस्ट ते डिसेंबर 2020 दरम्यान 28 केसेस रजिस्टर केल्या आणि 96 गुन्हेगारांना अटक केली, तर 2021 मध्ये मटका 17 डिसेंबर पर्यंत समीर वानखेडे यांनी 117 केसेस दाखल केल्या
आणि 234 गुन्हेगारांना अटक केली. त्यांनी तब्बल 1000 कोटी रुपयांची 1791 किलो ड्रग्स जप्त केली तर 11 कोटी रुपयांचा मालमत्ता गोठवली. ही तपशीलवार माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दिली आहे.
Mumbai Zonal Director Sameer Wankhede's tenure to end on 31Dec, he won't seek an extension. He arrested 96 ppl®istered 28 cases b/w Aug-Dec'20. In 2021,he arrested 234 ppl,registered 117 cases,seized over 1791 kg drugs worth appox Rs 1000cr &froze properties over Rs 11 cr: NCB — ANI (@ANI) December 17, 2021
Mumbai Zonal Director Sameer Wankhede's tenure to end on 31Dec, he won't seek an extension. He arrested 96 ppl®istered 28 cases b/w Aug-Dec'20. In 2021,he arrested 234 ppl,registered 117 cases,seized over 1791 kg drugs worth appox Rs 1000cr &froze properties over Rs 11 cr: NCB
— ANI (@ANI) December 17, 2021
समीर वानखेडे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मध्ये नेहमीच धडाडीचे अधिकारी म्हणून ओळखले गेले. आर्यन खान क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात ते अधिक चर्चेत आले. त्याआधी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना 200 किलो गांजा प्रकरणी जप्त करून अटक केली. सध्या समीर खान जामिनावर सुटला असून त्याच्या जामिनावर विरुद्ध नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो उच्च न्यायालयात गेले आहे.
समीर वानखेडे यांच्या विरोधात नवाब मलिक यांनी आर्यन खान केस नंतर मोठ्या प्रमाणावर मोहीम उघडली. त्यांच्या धर्मावरून देखील मोठ्या प्रमाणावर वाद उत्पन्न झाला. आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाया संदर्भात तपशीलवार माहिती देऊन त्यांची मुदत 31 डिसेंबर रोजी संपत आहे आणि त्यांनी मुदतवाढ मागितलेली नाही, असे स्पष्ट केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App