विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या राजकारणात उल्टापुल्टा सुरू झाले आहे. समाजवादी पक्षाने खासदारकीच्या निवडणुकीत भाजपाच्या ज्या उमेदवाराला पाडले होते त्यांच्याच पत्नीला योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. ब्राम्हण उमेदवार असल्याने त्या योगी आदित्यनाथ यांना चांगली लढत देऊ शकतील असा विचार समाजवादी पक्षानेकेला आहे.Samajwadi Party nominates wife of Ex Bjp Mp, crteria is Brahmin
भाजपचे माजी नेते उपेंद्र शुक्ला यांच्या पत्नी सुभावती शुल्का यांना समाजवादी पक्षाने तिकीट दिली आहे. नुकतेच सुभावती यांनी मुलासह समाजवादी पक्षात प्रवेश केला होता.भाजपचे दिग्गज नेते उपेंद्र शुक्ला यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. समाजवादी पक्षाने उपेंद्र शुक्ला यांच्या पत्नीला तिकीट देऊन अनेकांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे.
सपाने यापूर्वी भाजपचे विद्यमान आमदार डॉ. राधामोहन दास अग्रवाल यांच्यावर ताशेरे ओढले होते.गोरखपूरमधील भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या उपेंद्र शुक्ला यांना २०१८ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने गोरखपूर मतदारसंघातून तिकीट दिले होते.
त्यांचा समाजवादी पक्षाचे उमेदवार प्रवीण निषाद यांनी पराभव केला होता. प्रवीण हे निषाद पक्षाचे अध्यक्ष संजय निषाद यांचे चिरंजीव आहेत. मात्र सध्या निषाद पक्षाची भारतासोबत युती असून प्रवीण हे सध्या संत कबीरनगर येथील भाजप खासदार आहेत.
२०१९ मध्ये उपेंद्र शुक्ला यांच्या जागी भाजपने भोजपुरी चित्रपट स्टार रवी किशन शुक्ला यांना उमेदवारी दिली होती. उपेंद्र यांनी दीर्घकाळ सेवा केलेल्या पक्षाचे नेते त्यांची काळजी घेत नसल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गोरखपूरमधून योगी आदित्यनाथ यांचा विजय सोपा मानला जात असला तरी समाजवादी पक्षाने ब्राह्मण चेहºयाला तिकीट देऊन लढत रंजक करण्याचा प्रयत्न केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App