वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आपल्या नेत्याची अफाट स्तुती करण्याच्या नादात भलेभले नेते वाहवत जातात याचेच एक उदाहरण राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने समोर आले आहे. Salman Khurshid compares Rahul Gandhi with Rama
माजी परराष्ट्र राज्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधी यांच्यावर स्तुतीसुमने उधळताना राहुल गांधींची तुलना भगवान रामाशी केली आहे. राहुल गांधी हे सुपर ह्युमन आहेत. आम्ही सर्वजण कडाक्याच्या थंडीत कुडकुडत असताना ते फक्त टी-शर्ट घालून देशभरात भारत जोडो यात्रेत हिंडत आहेत.
Rahul Gandhi : काठमांडूत राहुल गांधी मैत्रिणीच्या लग्नाच्या पार्टीत सामील; काँग्रेस कडून खुलासा!!
एखाद्या योग्यासारखी ते तपस्या करत आहेत. भरताने भगवान रामांच्या खडावा आधी अयोध्येत आणल्या होत्या. त्यानंतर राम अयोध्येत आले. तशाच आम्ही आधी राहुल गांधींच्या खडावा उत्तर प्रदेशात आणल्या आहेत. त्या पाठोपाठ आमचे राम राहुल गांधी हे देखील उत्तर प्रदेशात येतील, अशी शब्दफुले सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधी यांच्यावर उधळली आहेत.
राहुल गांधींना सुपर ह्यूमन म्हणण्यापर्यंत ठीक आहे. पण त्यांची तुलना थेट भगवान राम यांच्याशी करणे हे जनेऊधारी राहुल गांधी यांना तरी पटेल का?, असा खोचक सवाल भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केला आहे.
आत्तापर्यंत काँग्रेसने रामाचे अस्तित्व देखील नाकारले होते. सुप्रीम कोर्टात राम जन्मभूमी केस मध्ये रामाला काल्पनिक पात्र म्हटले होते, तेच आता आपल्या नेत्याची तुलना रामाशी करताहेत आणि त्यांच्या खडवांचे पूजन करताहेत, असा टोलाही पुनावाला यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App