वृत्तसंस्था
अहमदाबाद : भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानमधून दारूगोळा, हत्यारांसह 300 कोटी रुपयांचे ड्रग्ज घेऊन येणारी बोट पकडली. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. गुजरातमध्ये इंडियन कोस्ट गार्ड आणि गुजरात पोलिसांनी एटीएसकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही पाकिस्तानी बोट ताब्यात घेतली. An arms smuggler’s boat with drugs worth 300 crores was caught from Pakistan
कशी केली कारवाई?
या बोटीमध्ये 10 पाकिस्तानी घुसखोर नागरिक होते. बोटीच्या कॅप्टनसह 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याशिवाय आयसीजीने या बोटीमधून दारूगोळा, हत्यारांसह 40 किलो ड्रग्ज जप्त केले. या ड्रग्जची किंमत तब्बल 300 कोटी रुपये आहे.
आयसीजीने सांगितले की, गुजरात पोलीस आणि कोस्ट गार्ड जवानांनी ही कारवाई 25 आणि 26 डिसेंबर रोजी केली. अरिंजय बोटीला पाकिस्तानला लागून असलेल्या भारतीय समुद्रात तैनात करण्यात आले होते.
त्यानंतर मासेमारी करणाऱ्या सहेली नावाच्या पाकिस्तानी बोटीला ताब्यात घेतले. त्या बोटीचा तपास केला असता त्यामुळे दारूगोळा, हत्यारे आणि 40 किलो ड्रग्ज आढळले. पाकिस्तानी बोटीसह सर्व सामान जप्त करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App