यूपीत योगींविरूध्द लढाईत प्रियांकांचा चेहरा काँग्रेससाठी उत्तम; सलमान खुर्शीद यांनी लावली मुख्यमंत्रीपदाची शर्यत


वृत्तसंस्था

लखनौ – उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूकीचे राजकारण तापायला सुरूवात झाली असताना काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी एक महत्त्वाचे राजकीय विधान करून योगी विरूध्द प्रियांका अशी मुख्यमंत्रीपदाची शर्यतच लावून टाकली आहे. उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी या काँग्रेससाठी उत्तम चेहरा आहेत. पण निवडणूकीला कोणत्या भूमिकेतून सामोरे जायचे हे त्यांचे त्यांनीच ठरवायचे आहे, अशी पुस्तीही सलमान खुर्शीद यांनी जोडली. Salman khursheed throws hat of priyanka gandhi in UP CM race

भाजपची मुख्य लढत ही काँग्रेसशीच असेल, असे पक्षाचे वरिष्ठ नेते सांगतात. तेव्हा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल, असे विचारल्यावर सलमान खुर्शीद यांनी वरील उत्तर दिले. ते म्हणाले, की विधानसभा निवडणुकीत मतदारांसमोर कशा प्रकारे जाणार हे प्रियांका गांधी स्वतः ठरवतील. प्रियांका स्वतः तसे संकेत देत नाहीत तोपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे उत्तर देता येणार नाही. पण त्या मुख्यमंत्रीपदासाठी एक उत्तम चेहरा आहेत. एकीकडे योगी आदित्यनाथ तर दुसरीकडे प्रियांका गांधी लढत असल्यास सर्व प्रश्नांची उत्तरे लगेच मिळतील, असे प्रतिपादन खुर्शीद यांनी केले.

सलमान खुर्शीद म्हणाले, की प्रियांका गांधी या आमच्या कॅप्टन आहेत. त्या निर्णय घेऊन आम्हाला कळवतील अशी अपेक्षा आहे. राज्यात आघाडी किंवा युती करण्यासाठी काँग्रेसची कुठल्याच पक्षासोबत चर्चा सुरू नाही. पण पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतल्यास मुद्दा वेगळा असेल.

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि बसपा सोबत आघाडी करणार नाही, असे समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी आधीच सांगितले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त ७ जागा जिंकता आल्या होत्या. तर समाजवादी पार्टीला फक्त ४७ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर अखिलेश यादव यांनी काँग्रेसशी आघाडी तोडली होती. त्यांनी पुन्हा काँग्रेसशी संपर्क केलेला नाही.

या पार्श्वभूमीवर सलमान खुर्शीद यांनी काँग्रेस उत्तर प्रदेशात कोणाशी आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Salman khursheed throws hat of priyanka gandhi in UP CM race

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात