स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये भाजप ओबीसी उमेदवार देणार; फडणवीसांची महत्त्वपूर्ण घोषणा


प्रतिनिधी

मुंबई – ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळवून दिल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही. ओबीसींना आरक्षण मिळेपर्यंत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलाव्यात अशी मागणी भाजपने राज्यापालांकडे केली आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ओबीसींना आरक्षण दिल्याशिवाय ठाकरे – पवार सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर केल्या, तर भाजप सगळे उमेदवार ओबीसी समाजातलेच देईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा देखील फडणवीस यांनी केली आहे. OBC reservation row; BJP to contest all OBC candidates in local body elections

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा आमचा लढा सुरू राहणार असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले.

ठाकरे – पवार सरकारने ओबीसी समाजाचा विश्वासघात केला आहे. ज्या निवडणुका जाहीर केल्या आहेत त्या पुढे ढकलाव्यात अशी विनंती आम्ही राज्यपाल यांच्याकडे केली आहे. एकीकडे कोरोना आहे असे राज्य सरकार म्हणत आहे आणि त्याच्या नावाखाली अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचा करत आहे. तर दुसरीकडे निवडणुका जाहीर केल्या जात आहे, मग तिकडे कोरोना पसरणार नाही का?

आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये. अशी मागणी त्यांनी केली आहे. तरी निवडणुका घेतल्या तर सर्व जागांवर ओबीसी उमेदवार देणार, अशी घोषणा फडणवीसांनी केली आहे.

उद्याच्या भाजपच्या कार्यकारिणीत पुढील आंदोलने आणि संघटनात्मक कार्यक्रम यावर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री कार्यालय लक्ष ठेवणार असेल तर ते चांगलेच आहे, ते खरेच असे करणार असतील तर त्याचे मी स्वागत करतो. कारण त्यांनी लक्ष ठेवले नाही तर काँग्रेस राष्ट्रवादीचे मंत्री काय काय करतील हे आम्हालाच उघड करावे लागेल. असा इशारा देखील फडणवीसांनी दिला आहे.

OBC reservation row; BJP to contest all OBC candidates in local body elections

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती